Chhatrapati Sambhaji Nagar Corona Update: पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाचे 19 नवे रुग्ण आढळून आले. यात शहरातील 14 तर, ग्रामीणमधील 5 नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 53  झाली असून, चिंता वाढत आहे. वाढत्या  कोरोनाचे रुग्ण पाहता सतर्क झालेल्या आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. 

Continues below advertisement

सध्याची परिस्थिती...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान मंगळवारी शहरात 14 तर, ग्रामीणमध्ये 5 अशा एकूण 19 नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दिवसभरात उपचाराअंती बरे झालेल्या 17 जणांची सुटी झाली. सध्या शहरात 42 तर, ग्रामीणमध्ये 11 असे एकूण 53 सक्रिय रुग्ण आहे. तर यांपैकी 4 रुग्ण हॉस्पिटलमध्ये तर 49 जण घरीच उपचार घेत आहेत. दरम्यान, नागरिकांनी स्वतः कोरोना नियमावलीचे पालन करावे, गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी... 

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 19 रुग्ण आढळून आले आहे. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून, चिंतेचे कोणतेही कारण नाही. पण असे असताना नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावे. घरी घेल्यावर हात स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजे. तसेच कोरोनाचे लक्षण दिसताच चाचणी करून घेतली पाहिजे, असेही आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

 आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करता येणार...

शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा आकडा पुन्हा वाढतोय. त्यामुळे आरोग्य विभाग देखील अलर्ट झालं आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात पुन्हा कोरोना चाचण्या केल्या जात आहे. तर शहरातील सर्वच आरोग केंद्रात सद्या कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोबतच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना जर लक्षणे जाणवत असतील, तर त्यांची देखील कोरोना चाचणी केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar News : ॲपल बोर जास्त खाल्याने 65 मेंढ्यांचा मृत्यू: छत्रपती संभाजीनगरमधील घटना