Chandrakant Patil on Babri Masjid Demolition : बाबरी मशीद पाडण्यात (Babri Masjid Demolition) एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. तसेच पाटील यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. दरम्यान यावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. 'बाबरी पाडताना तिथे शेकडो शिवसैनिक होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करायला नको पाहिजे,' असे शिरसाट म्हणाले आहे. 


यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करायला नको पाहिजे असे माझं स्पष्ट मत आहे. राम जन्मभूमीचं जे आंदोलन होते, ते कोणत्याही एका पक्षाचे नव्हते. देशभरातील प्रत्येक हिंदू आणि रामभक्त या आंदोलनाच्या बाजूने होता. त्यामुळे त्याला पक्षाच्या चौकटीत आणू नका. अनेकजण गेले होते. अनेकांचे जीव गेले. त्यामुळे या पक्षाचे होते, त्या पक्षाचे होते असे कधीही ग्राह्य धरू नका. तसेच त्यावेळी जे आंदोलन झाले, त्यामुळेच आज राम मंदिर उभं राहिलं असल्याचं शिरसाट म्हणाले. 


शिवसैनिक नव्हे तर कारसेवक...


बाबरी ज्यांनी पाडली त्यावेळी तिथे उपस्थित असलेले शिवसैनिक नव्हते, तर ते कारसेवक असल्याचं देखील शिरसाट म्हणाले. तर आता मंत्रीमंडळात मंत्री असलेले अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे आमच्या कारसेवकांचे नेतृत्व करत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हे मात्र चंद्रकांत पाटील विसरले असतील, त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असावे असं शिरसाट म्हणाले. 


शिंदे गटाची अडचण होते आहे का? 


चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून शिंदे गटाची अडचण होत आहे का? यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, आमची कोणतेही अडचण झाली नाही. पाटील विसरले असतील, म्हणून त्यांना आम्ही आठवण करून दिली आहे. त्या कारसेवकांमध्ये आमचे अनेक जण गेले असून, काही शाखाप्रमुख यांचा मृत्यू झाला होता. काही शिवसैनिकांचा यावेळी जीव गेला. त्यामुळे राजकारणासाठी रामलल्लाचा वापर करू नयेत या मताचा मी असल्याचं शिरसाट म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Raj Thackeray: बाळसाहेबांच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज एकत्र, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला व्हिडीओ शेअर राज ठाकरेंचा दुजोरा