छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये डीआरआयने पुन्हा एकदा मोठी कारवाई केलीये. डीआरआयच्या पुणे आणि अहमदाबाद युनिटने ही संयुक्त कारवाई केली आहे. दोन फार्मा कंपन्या यावेळी सील करण्यात आल्या आहेत. पैठण एमआयडीसीतील देखील दोन कंपन्या सील केल्यात.  ड्रग्ज बनवण्यासाठी लागणार कच्चा माल डीआरआयने जप्त केलाय. 107 लीटरचा हा कच्चा माल होता. ज्याची अंदाजे किंमत 160 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली. यामध्ये दोन लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


 यामध्ये मेफेड्रोन, केटामाइन आणि कोकेन जप्त करण्यात आले. आहे.  दरम्यान अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात सातत्याने आणि जलद गतीने तपास केला जात आहे. Apex Medichem Pvt. नावाच्या कंपनीच्या कारखान्याचा डीआरआयच्या पथकाकडून शोध लावण्यात आला होता. या कारखान्यांमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या पथकांनी कारवाई केली.


सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु करण्यात आलाय. डीआरआयच्या ऑपरेशनमुळे सिंथेटिक औषधांचा वाढता वापर आणि या औषधांच्या निर्मितीमध्ये औद्योगिक युनिट्सचा गैरवापर यावर सातत्याने प्रकाश पाडण्यात येत आहे. दरम्यान अंमली पदार्थांविरोधात सध्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात कारवाईचे सत्र सध्या सुरु आहे. 


याआधीही डीआरआयने केली होती कारवाई 


याआधी देखील डीआरआयच्या पुणे आणि अहमदाबाद पथकाने संयुक्तरित्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई केली होती. या कारवाईमध्ये जवळपास 250 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तसेच हे अंमली पदार्थ गुजरातवरुन आले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये ही पुणे आणि अहमदाबाद डीआरआयची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. 


हेही वाचा : 


मराठवाड्यात आंदोलन पेटलं! जालन्यात तहसीलदाराची गाडी फोडली; संभाजीनगर हिंगोली,परभणी, नांदेड लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद