छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा खंड पाहायला मिळत होता. मात्र, गुरुवारी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गुरुवारी अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाण्याची आवक सुरू झाली आहे. जायकवाडी धरण प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 12 हजार 244 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. तर सध्या जायकवाडी धरणात 33.97 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 


मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात जोरदार पाऊस न झाल्याने जायकवाडीच्या पाण्यासाठी देखील अपेक्षित अशी वाढ होतांना दिसत नाही. त्यामुळे धरणात केवळ  33 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यातच गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात आता पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा देखील वाढतांना पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही गेल्यावर्षीपेक्षा सध्याचा पाणीसाठा खूप कमी आहे.


जायकवाडी धरणातील पाणीसाठा (22 सप्टेंबर 2023)   



  • जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.09 फूट 

  • जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.361 मीटर 

  • एकूण पाणीसाठा दलघमी : 1475.592 दलघमी

  • जिवंत पाणीसाठा दलघमी : 716.506 दलघमी

  • जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 33.97 टक्के 

  • जायकवाडी धरणात पाण्याची आवक :  12244

  • जायकवाडी धरण बाष्पीभवन : 00

  • उजवा कालवा विसर्ग : 800 क्युसेक 

  • डावा कालवा विसर्ग : 1700 क्युसेक 


मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा 



  • मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2142.277 दलघमी

  • मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 96.68 टक्के 

  • 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 362.07 दलघमी  (12.81 टीएमसी)

  • 1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.41 दलघमी


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस...


मागील काही दिवसांपासून खंड पडलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी सहा वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत पाहायला मिळाला. पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव, कन्नड, खुलताबाद असे जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस पाहायला मिळाला. त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र अजूनही विहिरी, छोटे-मोठे तलाव कोरडेठाक पडली आहे. त्यामुळे पुढील काळात अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा आहे.


हे ही वाचा:


Maharashra Drought : दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश