Agriculture News : शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. एबीपी माझाच्या (Abp Majha) बातम्यानंतर 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा  (Vima) कंपनीनं स्वीकारला आहे. माझाच्या बातमीनंतर काही तासात शेतकऱ्यांचा विमा कंपनीनं स्वीकारला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)अजूनही 2 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे दावे फेटाळलेले आहेत. कंपनीने दावे फेटाळण्याचे दिलेले कारण योग्य न वाटल्यास कृषी विभाग कंपनीवर कारवाई करणार आहे. वेळप्रसंगी विमा कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देखील जिल्हा कृषी अधीक्षक देशमुख यांनी दिला आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे (heavy rain) झालेल्या नुकसानीत विमा कंपनीने (insurance company) 70 टक्के शेतकऱ्यांचे (Farmers) दावे फेटाळले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. या नुकसानीत 680548 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पूर्व सूचना दिल्या होत्या. त्यापैकी विमा कंपन्यांनी 229155 दावे स्वीकारले तर 451393 दावे फेटाळले आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. आता 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा  (Vima) कंपनीनं स्वीकारला आहे. 


शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मदत नाही


शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पंतप्रधान पीक विमा योजनेतर्गत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला जाब विचारला आहे. मात्र आज संध्याकाळपर्यंत उत्तर न आल्यास याबाबत कृषी अधिकरी थेट शासनाकडे विमा कंपनीची तक्रार करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी पी. आर.देशमुख  यांनी दिली होती. 


छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली


दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तसे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, आणि त्यातही सरकार आणि विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पिकविम्याचे 70 रूपये आलेत. पण त्यासाठी बँकेत बॅलन्स एक हजार रूपये ठेवावे लागत आहेत. या सर्व प्रकारामुळं शेतकी आक्रमक झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरुनसुद्धा नुकसानभरपाई मिळाली आहे. नुकसान होऊनही मदत का मिळत नाही असा सवालही शेतकरी करत आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांचे पिक विम्याचे दावे देखील कंपनीने फेटाळले आहेत. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. त्यानंतर आता काही दावे स्वीकारले आहेत.


महत्वाच्या बातम्या:


विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक