छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आले आहे. वैजापूर तालुक्यातील कापूसवडगाव येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, संतोष दिनकर  थोरात (वय 36 वर्ष), दिनकर माणिकराव थोरात (वय 60 वर्ष), रंजना दिनकर थोरात (वय 50 वर्ष) असे आरोपींचे नावं आहे. 


भारती ही झोपेतून उठत नसुन ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचा फोन भारतीचा भाऊ ज्ञानेश्वर भगवान कदम यांना आला होता. तसेच, तिला वैजापुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वरला मिळाली होती. त्यामुळे आपल्या चुलतभावासह ज्ञानेश्वर वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात पोहचला. तसेच, अपघात विभागात जावुन बहीणीला पहिले असता तिचा मृत्यू झाला होता. तर, भारतीच्या गळ्यावर गळा दाबल्याचे व्रण दिसत होते. सोबतच गळ्यावर ओरबाडल्याचे खुणा दिसत होत्या. त्या ठिकाणी लाल झाल्याचे दिसत असल्याने तिचा गळा दाबण्यात आल्याचा संशय येत होता. याबाबत, भारतीच्या पती व सासु सासरे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ज्ञानेश्वर भगवान कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


माहेराहून पैसे आणण्यासाठी दिला जायचा त्रास...


ज्ञानेश्वर भगवान कदम यांनी वैजापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची बहीण भारतीचे 12 वर्षापुर्वी कापुसवाडगाव येथील संतोष दिनकर थोरात सोबत लग्न झाले होते. तसेच लग्नाच्या वेळी भारतीच्या वडीलांनी दिडलाख रुपये हुंडा व अंगावर दागदागिने दिलेले होते. सोबतच, संसारपयोगी सर्व वस्तु दिल्या होत्या. दरम्यान, भारती सासरी नांदण्यास आल्यानंतर तिला सुरुवातीचे सहा महिने चांगली वागणूक देण्यात आली. मात्र, काही दिवसांनी पती व सासरचे लोक संगनमत करुन वेगवेगळ्या कारणावरुन भांडण करू लगले.  तसेच, नेहमी तुझ्या बापाने आम्हाला काही दिले नाही. तु तुझ्या माहेराहून पैसे घेवुन ये अशी मागणी करु लागले. भारती यांनी याबाबत आई-वडीलांना सांगितले. त्यामुळे, भारती यांच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांना समजावुन सांगितले की, लग्नाच्या वेळी भरपुर खर्च झाला आहे. आम्ही तुम्हाला लग्नावेळी आमच्या आयपतीप्रमाणे मानपान  केलेला आहे. आता आमच्याकडे पैसे नाही. आम्ही तुम्हाला पैसे देवु शकत नाही, असे सांगितले होते. 


सतत शिवीगाळ करुन मारहाण 


भारती यांच्या आई-वडिलांनी समजावून सांगून देखील सासरचे लोकं छोट्या छोट्या कारणावरुन त्यांना मानसिक व शारीरीक त्रास देत होते. तसेच, सुमारे पाच महिन्यांपुर्वी भारती खुप आजारी असल्याचे तिने भावाला फोन करुन सांगितले.  त्यावेळी तिच्या सासरच्या मंडळी तिला दवाखान्यात घेवुन गेले नव्हते. तसेच, तिला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होते. त्यामुळे भारतीच्या भावाने तिच्या गावाकडे जावुन तिला दवाखान्यात नेवुन औषधोपचार केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Bhiwandi : पत्नीसोबत फोनवर बोलला म्हणून केली हत्या, पत्नीलाही मारण्यास निघाला पण पोलिसांच्या तावडीत सापडला