HSC Exam Handwriting Scam: राज्यभर गाजलेल्या बारावीचा (HSC) भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकाच्या हस्ताक्षर बदल प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणामधील आरोपी तब्बल 45 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती लागले नाही. भगवानसिंग उसारे व मनीषा भागवत शिंदे असे या दोन्ही आरोपी शिक्षकांचे नावं असून, गेल्या दीड महिन्यापासून फर्दापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मात्र अजूनही त्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले नाही. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींचे मोबाईल देखील बंद आहे. 


भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल आढळून आल्याने शिक्षण मंडळाने या प्रकरणी चौकशी समितीची नेमणूक करून, या प्रकरणी फर्दापूर पोलिसात भगवानसिंग उसारे व मनीषा भागवत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होण्याची माहिती मिळताच दोन्ही शिक्षक आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या शोध घेत आहे. मात्र दीड महिना उलटत आला, पोलिसांना आरोपी काही सापडत नसल्याचे चित्र आहे. पोलिस दोन्ही आरोपींच्या घरावर पाळत ठेवून आहेत. तसेच या प्रकरणात आतापर्यंत एकूण 30 जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. त्यामुळे एवढ्या महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना दीड महिना उलटूनही सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व इतर ठिकाणच्या बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या 372 उत्तरपत्रिका सोयगाव तालुक्यातील धनवट व पिंपळा येथील राजकुंवर महाविद्यालयात तपासण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल असल्याचे समोर आले होते. बोर्डाने याची चौकशी केली असता हे पेपर भगवानसिंग उसारे व मनीषा भागवत शिंदे यांच्याकडे तपासणीसाठी गेले होते. विशेष म्हणजे 372 उत्तरपत्रिकेत अक्षर बदल असतांना देखील या दोन्ही शिक्षकांनी याची माहिती शिक्षण मंडळाला दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोयगावचे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी 25  मे रोजी फर्दापूर पोलिसांत फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हा पासून हे दोन्ही शिक्षक फरार आहे. 


भौतिकशास्त्र शिकवण्याचा अनुभव नसताना खोटी माहिती दिली 


विशेष म्हणजे या दोन्ही शिक्षकांनी भौतिकशास्त्र विषय शिकवण्याचा कोणताही अनुभव नसताना तो आपण शिकवत असल्याची खोटी माहिती विभागीय शिक्षण मंडळाला दिली होती. यातील महिला आरोपीला फक्त एक वर्षांचा अनुभव होता, मात्र तिने आपल्याला दीर्घ अनुभव असल्याची खोटी माहिती शिक्षण मंडळाला दिली होती. तर या दोन्ही संशयित आरोपींकडून एकूण 372 विद्यार्थ्यांना हस्ताक्षर बदलातून 10 ते 30 गुण वाढवून देण्यात आल्याचे देखील तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Handwriting Scam : हस्ताक्षर बदल प्रकरण! विषयाचा अनुभव नसतानाही पेपर तपासणीसाठी, उत्तरपत्रिकेत 10 ते 30 गुण वाढवून दिले


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI