छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. यावेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेलला आग लावण्यात आली. मात्र, ही आग मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नातेवाईकांनीच लावल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषेदत ते बोलत होते. 


दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "जाणीवपूर्वक षड्यंत्र सुरु असून, गोरगरिबांचे मुलं पोलिसांच्या खोट्या केसमध्ये अडकवले जात आहे. बीड येथील भुजबळ यांच्या पाहुण्याचे हॉटेल फोडण्यात आले. मात्र, ते हॉटेल त्यांच्याच पाहुण्यांनी फोडले असल्याची खात्रीलायक माहिती मला मिळाली आहे. मराठा समाजातील मुलं अशी तोडफोड करणार नाही. मात्र, मराठा समाजातील मुलं खचली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जरांगे म्हणाले आहे. 


मराठा नेत्यांनी पुढाकार घ्यावा...


तर, छगन भुजबळ स्वतः बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्याकडे जाऊन बसले होते. त्यांनी काही लोकांची नावं देखील दिली असून, पुरवण्या तयार करून मराठा समाजातील मुलांना पोलीस केसमध्ये अडकवण्याचा षड्यंत्र सुरु असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे आता मराठा समाजातील नेत्यांनी आपल्या मुलांसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे. तर, मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी समज द्यावे, असेही जरांगे म्हणाले. 


शिष्टमंडळाबाबत आता आम्ही थेट भूमिका घेऊ...


आज पुन्हा सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार होते. यावेळी या शिष्टमंडळाकडून टाईम बॉन्डबाबतचा अहवाल सादर करण्याची शक्यता होती. मात्र, आता शिष्टमंडळ आज ऐवजी उद्या येणार आहे. यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शिष्टमंडळ आज येणार असल्याचे सांगतिले गेले होते. मात्र, आता मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असून, हे शिष्टमंडळ उद्या येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला गेल्याने शिष्टमंडळ येण्यास उशीर झाला असल्याचे सांगण्यात आले. पण, आम्ही उद्याच्या दिवशी वाट पाहू, अन्यथा आम्ही भूमिका घेणार असल्याचे" जरांगे म्हणाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : सरकारच्या 'टाईम बॉन्ड'चाही 'टाईम' हुकणार; शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला आज येणार नाही?