औरंगाबाद : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून, हर्सूल कारागृहात (Harsul Jail) असलेल्या काही कैद्यांनी एकत्र येऊन जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. संबंधित अधिकारी कारागृहात कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर कैद्यांनी हल्ला केला आहे. दरम्यान, या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात एकूण 9 कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्सूल कारागृहातील पथक कैद्यांची झडती घेत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. तुरुंगाधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर, अमित चंद्रकांत गुरव आणि सुमंत सुर्यभान मोराळे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

तर या प्रकरणी शाहरुख अकबर शेख (वय 30वर्षे), सतिश काळुराम खंदारे (वय 30वर्षे), गजेंद्र ऊर्फ दादा तुळशीराम मोरे (वय 42वर्षे), निखील भाऊसाहेब गरड (वय 25 वर्षे), किरण सुनिल साळवे (वय 22 वर्षे), ऋषीकेश रविंद्र तनुपरे (वय 25वर्षे), अनिल शिवाजी गडवे (वय 25वर्षे), अनिकेत महेंद्र दाभाडे (वय 22वर्षे) राज नामदेव जाधव (वय 26वर्षे) असे आरोपींचे नावं आहेत. 

काय आहे प्रकरण? 

प्रवीण रामचंद्र मोडकर हे औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात गेल्या दिड वर्षापासुन तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान 27 ऑगस्ट रोजी मोडकर यांची झडती पथकात ड्युटी लागली होती. ज्यात कारागृहातील बंद्या जवळ काही अवैध वस्तु शोधणे, संशस्यपाद हालचालीवर लक्ष ठेवणे अशी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. सकाळी अथे वाजेच्या सुमारास झडती ड्युटी सुरु असतानाच एका कैद्याने येऊन शाहरूख अकबर शेख हा कैदी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली. त्यामुळे अंतर्गत सुरक्षा प्रमुख अधिकारी सतिष हिरेकर यांनी चौकशीसाठी शाहरूखला बोलावून घेतले. तर त्याची चौकशी सुरु असतानाच तो जोरजोरात ओरडू लागला. तसेच तक्रार करणाऱ्या दुसऱ्या कैद्याला थेट मारहाण करू लागला. त्यामुळे उपस्थित असलेल्या कर्तव्यावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ हस्तक्षेप करुन वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. 

Continues below advertisement

जेलमधील अधिकारी आणि कर्मचारी वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच शाहरूखने  तुरुंगाधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर यांच्या गळ्याला पकडुन पायात पाय घालुन खाली पाडले व लाथाबुक्याने मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान याचवेळी बॅरेक क्र. 1 मधील काही कैदी बॅरेकचा दरवाजा हाताने जोरात ढकलून बाहेर आले. यातील गजेंद्र तुळशीराम मोरे याने या भांडणामध्ये येवून इतर कैद्यांना चिथावणी देवून अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ला करण्यासाठी भडकविले. त्यामुळे इतर सर्व आरोपींनी मिळून कारागृहातील अधिकारी आणिकर्मचारी यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Aurangabad Crime : विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने सुटली गोळी; घेतला स्वतःच्याच लेकराचा बळी