Harshvardhan Jadhav Heart Attack : बीआरएस पक्षाचे नेते आणि कन्नड तालुक्याच्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना दिल्लीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. विशेष म्हणजे याबाबत स्वतः हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडीओ बनवत स्टेट्सला ठेवत माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला गेले असताना, गडकरींच्या निवासस्थानीच त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. तर सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


कन्नडचे माजी आमदार आणि सध्या बीआरएस पक्षात असलेले हर्षवर्धन जाधव नेहमी वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतात. तर आपल्या थेट भूमिकेमुळे देखील त्यांची नेहमी चर्चा होते. दरम्यान अशात आपल्या मतदारसंघातील विकास कामाच्या निमित्ताने ते सतत सत्ताधारी पक्षाच्या वेगेवेगळ्या नेत्यांच्या संपर्कात असतात. दरम्यान अशाच काही कामानिमित्त हर्षवर्धन जाधव आज दिल्लीत होते. यावेळी ते केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र याचवेळी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आपल्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं जाधव म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्यावर दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात उपचार सुरु आहे. 


काय म्हणाले जाधव? 


तब्येत बिघडल्याने जाधव यांना रूग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान याचवेळी जाधव यांनी व्हिडीओ बनवत आपल्या स्टेट्सला ठेवून याची माहिती दिली.  ज्यात त्यांनी म्हटले की, "मला बहुतेक हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला आहे. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. माझी आधी अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू, असं आवाहन जाधव यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केले. 


कार्यकर्त्यांची फोनाफानी... 


आपल्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून, आपल्याला रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती माजी आमदार जाधव यांनी स्टेट्सला व्हिडीओ ठेवत दिली. दरम्यान काही वेळात याची माहिती जाधव यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि समर्थकांना मिळाली. जाधव दिल्लीत असल्याने नेमकं काय झाले आणि जाधव यांची तब्येत कशी आहे याबाबत कार्यकर्त्यांना चिंता होऊ लागली. त्यामुळे जाधव यांचे पीए आणि त्यांच्या जवळच्या लोकांना कार्यकर्त्यांनी एकामागून एक फोन सुरु केले. मात्र जाधव यांची तब्येत ठीक असून, काळजी करण्याची गरज नसल्याची माहिती मिळाल्यावर कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता बीआरएस पक्षात फुट पडण्याची शक्यता; 'या' नेत्याने दिला थेटच इशारा