छत्रपती संभाजीनगर : नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी पत्नी ईशा झा (Isha Jha) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मागील काही दिवसांपासून ईशा झा यांच्या वागण्यात-बोलण्यात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना कुणीतरी ब्लॅकमेल (Blackmail) करत असल्याची धक्कादायक माहिती जाधव यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत (Press Conference) बोलतांना त्यांनी हा आरोप (Allegation) केला आहे. सोबतच ईशा झा यांना सुरक्षा पुरवण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. 

Continues below advertisement

दरम्यान यावेळी पुढे बोलतांना जाधव म्हणाले की, "मागील काही महिन्यांपूर्वी ईशा झा यांचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप (Video Audio Clip) समोर आल्या होत्या. तेव्हापासून अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे या सर्व घटनांमध्ये कोणीतरी वेगळाच बोलावती धनी असण्याची शक्यता असावी आणि असा माझा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व प्रकारचा तपास झाला पाहिजे. सोबतच ईशा झा यांना संरक्षण देण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. 

माझ्यासोबत मोठा राजकीय धोका होणार...

पुढे बोलतांना जाधव म्हणाले की, ईशा झा या आता पूर्णपणे वेगळ्या वागत आहेत. त्यामुळे मला शंका आहे की, त्यांना हे कोणीतरी करायला लावते की काय?, त्यांच्यावर दडपण आणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे का? असे प्रश्न जाधव यांनी उपस्थित केले. माझ्यासोबत मोठा राजकीय धोका होणार असल्याची माहिती सहा महिन्यांपूर्वी मला माझ्या काही राजकीय मित्राने दिली होती. त्याप्रमाणे घडतांना मला दिसत असल्याचे देखील जाधव म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

ईशा झा यांनी केली होता गंभीर आरोप...

गेल्यावर्षी ईशा झा यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत हर्षवर्धन जाधव यांच्यावर गंभीर आरोप केला होता. "माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे माझ्यावर सतत संशय घ्यायचे. घरातील एका मुलांसोबत त्यांनी माझे नाव जोडले. हर्षवर्धन जाधव यांनी मला जबर मारहाण केली. त्यामुळे आता मी कन्नडमध्ये यापुढे थांबणार नसल्याचे ईशा झा यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले होते. मात्र, पुढे काही दिवसांनी दोघांमधील वाद संपले आणि दोघेही पुन्हा एकत्र आले होते. असे असतानाच आता जाधव यांनी नव्याने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार; फडणवीसांचे सूतोवाच