छत्रपती संभाजीनगर : क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्धा तासात पैसे डबल करून देतो अशी थाप मारून फसवणूक करणाऱ्या आरोपीला छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सायबर पोलिसांच्या पथकाने या भामटयाला थेट गुजरातच्या सुरतमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी क्रिप्टो ट्रेडिंग (Crypto Trading) नावाचे इन्सटाग्राम (Instagram) खाते तयार करून देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील लोकांची फसवणूक करत असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अबुबकर मोहमंद शबीर नवाब (वय 38 वर्षे, रा. मिरा अपार्टमेंट शिंदवाडा, नानपुरा, सुरत) असे या आरोपीचे नाव आहे. 


कन्नड येथील तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाणे ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलास अज्ञात इन्स्टाग्राम खात्याचा वापरकर्ता याने क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्धा तासात पैसे डबल करून देतो अशी थाप मारली. तसेच, 71 हजार 80 रूपयांचा भरणा करून घेवुन फसवणूक केली होती. यावरुन सायबर पोलीस ठाण्यात आयटी ऍ़क्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनानुसार ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हयांचा अत्यंत बारकाईने व तांत्रिक विश्लेषणांचे आधारे सायबर पोलीसांनी तपास केला.  या गुन्हयात गुजरात राज्यातील भामटयांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सय्यद महंमद उनेस मियॉ हाफीज (वय 30 वर्षे, रा. नानपुरा मार्केट,सुरत गुजरात) यास  सुरतमधून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र याचा मुख्य सूत्रधार अबुबकर मोहमंद शबीर नवाब फरार झाल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. 


पोलिसांनी थेट सुरतमध्ये सापळा लावला...


दरम्यान, मुख्य सुत्रधार मागील एक वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी सायबर पोलीसांचे एक पथक तयार करण्यात आले. हे पथक सुरत येथे पाठविण्यात आले होते. पथकांने रात्र-दिवस आरोपीचा ठाव ठिकाणांचा शोध घेवुने गोपनीय बातमीदार नेमुण तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मुख्य आरोपीचा ठिकाण कसोशीने शोधण्यास सुरूवात केली. यावेळी संशयीत हा सुरत शहरातील जनता मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळताच, यावरून पथकांने तात्काळ जनता मार्केट येथे सापळा लावला. यावेळी संशयीत ईसम हा पोलीसांना येतांना दिसताच पथकाने  त्याच्या दिशेने धाव घेतली. पोलीसांची हालचाल बघुन मार्केटमधील गर्दीचा फायदा घेवुन त्याने जोरात धुम ठोकली. परंतु पोलीसांनी त्यांचा कसोशिने पाठलाग करून काही अंतरावर त्याच्या मुसक्या आवळल्या. 


क्रिप्टो ट्रेडिंग नावाचे इन्सटाग्राम 05 खाते बनवले...


पोलिसांनी अबुबकर मोहमंद शबीर नवाब याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, हा गुन्हा त्यानेच आपल्या साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे कबुली दिली आहे. त्यामुळे त्याला या गुन्हयात अटक करण्यात आली असुन, न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, आरोपींनी लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांने क्रिप्टो ट्रेडिंग नावाचे इन्सटाग्राम 05 खाते तयार केले होते. ज्यांना, शिव ट्रडेर्स, ट्रेड इन क्रिप्टो, रॉयल इन्व्हेस्टमेंट, क्रिप्टो ऑन इंडिया, बिट कॉईन इन्व्हेस्टमेंट असे नावे देण्यात आली आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Palghar News : काय म्हणावं आता! पालघरमध्ये सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात