CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असेलल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. सगळे दगड एकत्र आले, या दगडांकडून काय अपेक्षा करणार? यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या 9 एप्रिलला अयोध्या दौरा करून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


अयोध्या आम्हाला श्रद्धेचा विषय


शिवसेन पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अयोध्या आमच्यासाठी भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. आम्ही या विषयाकडे राजकारण म्हणून पाहिलं नाही आणि पाहणार सुद्धा नाही. दुसऱ्यांदा आम्ही बोलू इच्छित नाही. शरयू नदीवर आरती करणार आहोत. अयोध्येतील राम मंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्ही सागाची लाकडे मंदिरासाठी पाठवली आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेली चांदीची वीट पाठवली होती. त्यामुळे अयोध्या आम्हाला श्रद्धेचा विषय आहे. मंदिर निर्माणाधीन भागातही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


सावरकरांचा काँग्रेस, राहुल गांधींकडून जाणीवपूर्वक अपमान 


दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सावकरांकडून काँग्रेस आणि राहुल गांधींकडून जाणीवपूर्वक अपमान सुरु असल्याचा आरोप केला. सावरकरांचा अपमान हा देशभक्तांचा अपमान आहे. त्यामुळे याला सडेतोड उत्तर देण्यासाठी गौरव यात्रा काढली जात आहे. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांनी अपमान केल्यानंतर बाळासाहेबांना स्वत: जोडे मारो आंदोलन केले होते. आणि त्यांचे चिरंजीव नातू सावकरांची अपमान करणाऱ्यांची गळाभेट घेत असल्याचे आपण पाहत आहे. मांडीला मांडी लावून बसत आहेत. हे मनाला वेदना देणार आहे. 


महाविकास आघाडीची ही वज्रमुठ नव्हे वज्रझुठ 


ते म्हणाले की चांगल्या कारणासाठी लोक एकत्र येतात त्याला वज्रमुठ म्हणतात, पण हे सर्व वज्रझुठ आहेत. सत्तेला हपालेलली खोटारडी लोक एकत्र आली आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करणार का? अशी विचारणा त्यांनी केली. नाना पटोले यांनी सभेला दांडी मारल्याने हे तीन तिघाडा आणि काम बिघाडा असं असल्याचे ते म्हणाले. सत्तेसाठी महाविकास आघाडी झाल्याचे टोला त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या