छत्रपती संभाजीनगर: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफची टीम नागरिकांच्या मदतीला धावून गेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नारेगाव ,चिखलठाना परिसरात काल संध्याकाळच्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या वतीने पाणी काढण्याचे काम सुरू होते. महापालिकेचे 2 जेसीबी पाणी पाणी काढण्याचे काम करत होते. अचानक आलेल्या पावसाला अनेक घरात पाणी शिरलं घराशेजारी उभा केलेल्या कार पूर्णपणे पाण्यात बुडाल्या होत्या.
छत्रपती संभाजी नगरच्या नारेगाव पिसादेवी भागात काल संध्याकाळच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. ही दृश्य आता सकाळची आहेत. वाहून गेलेल्या गाड्यांची काय स्थिती झाली हे आपण यातून पाहू शकतो. पावसामुळे रस्ता खरवडून गेलाय.
रस्त्यावरून वाहतंय पाणी
शहर परिसरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून काही घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं आहे. तर परिसरातील काही चारचाकी वाहने देखील पाण्याखाली गेली आहेत, या पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही ठिकाणची घरे देखील पाण्याखाली गेली, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं दिसून आलं, तर अनेक गाड्यादेखील पाण्याखाली गेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात काही क्षणात झालेल्या ढगफुटी सुदृश्य पावसाने सर्वत्र हाहाकार केला. मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे दिसत आहे.
करमाड, छत्रपती संभजीनगर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला. यामुळे कूबेर गेवराई, बनगाव, जयपुर, वरझडी परिसरात झालेल्या पावसाने लाहूकी नदीला मोठा पूर आला. या पूराचे पाणी कूबेर गेवराई,बनगाव येथील अनेक घरात शिरल्याने नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी शेतीची माती वाहून गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झालं आहे.
रस्ता म्हणायचा की ओढा?
मुसळधार पावसामुळे संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या पाण्याचा ओढा झाल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग नदीसारखा दिसू लागला असून अजिंठा लेणी परिसरातून येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची अनेक वाहने तासन्तास अडकून पडली होती.यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अखेर संभाजीनगरजवळील चौकाजवळ डोंगरातून तात्पुरता रस्ता तयार करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, रस्त्यावरून ओढ्यासारखे पाणी वाहू लागल्याने रस्त्याच्या कामातील त्रुटींचा भांडाफोड झाला आहे. पावसाच्या पाण्याने महामार्गाची दयनीय अवस्था उघडकीस आणल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.