छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद गावाजवळ एक भीषण अपघात झाला. हा अपघात ट्र्क आणि दुचाकी यांच्यात झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर एक महिला यामध्ये जखमी झाली आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की या घटनेत जागीत मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणावा लागला होता.
अपघातात एकाच कुुटंबातील तिघांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद गावाजवळ अपघात झाला. सताळा गावाकडे वळण घेणाऱ्या मोटरसायकलला ट्रकनं धडक दिली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात एक जखमी जण जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगरमधील या भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला. 10 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.
ट्र्क आणि दुचाकीचा हा अपघात एवढा भीषण होता की मृतदेह काढण्यासाठी जीसीबीचा वापर करावा लागला. या घटनेत गोपाल मंगुसिंग चंदनसे वय 45 , मुलगा रुद्र गोपाल चंदनसे वय 8 आणि मुलगी अनु गोपाल चंदनसे 10 यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गोपाल चंदनसे यांच्या पत्नी मीना बाई गोपाल चंदनसे वय 40 या जखमी झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील आळंद गावाजवळ झालेला हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. अपघातात ज्यांनी जीव गमावला ते तिघे जण ज्या दुचाकीवरुन प्रवास करत होते. त्या दुचाकीचा या अपघातात चेंदा मेंदा झाला आहे.