छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहरातील (Chhatrapati Sambhajinagar Police) पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्येच पोलिस आयुक्तांची गाडी फोडल्याने खळबळ उडाली आहे. सबंधित व्यक्तीने कार्यालयाची मुख्य काचेचा दरवाजा देखील फोडला आहे. मस्के नावाच्या व्यक्तीने दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दगडफेक केल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून दगडफेकीत कारच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. 


बॅगमध्ये दगड घेऊन येत कृत्य 


मस्के नावाच्या व्यक्तीने बॅगमध्ये दगड घेऊन येत पोलिस आयुक्तालयाची मुख्य दरवाजाची काच आणि आयुक्तांची गाडी फोडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलीस पहारे देत असणाऱ्या पोलीस आयुक्तालयातच घडला. माझे गुन्हे नोंदवून घेत नाही, असा या व्यक्तीचा राग होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्तांचीच गाडी आयुक्तालयात फुटत असेल तर आम जनता कुणावर विश्वास ठेवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या