Chhatrapati Sambhajianagar: सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना भरधाव आलेल्या क्रेटा कारने भर रस्त्यात चिरडलं. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यातील नंद्राबादे परिसरात आज (३ ऑगस्ट) सकाळी हा भीषण अपघात घडला. (Accident News)
या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अशोक यादवराव घुसळे आणि ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव अशी आहेत. हे दोघेही सकाळी रोजच्या प्रमाणे चालण्यासाठी बाहेर पडले होते.
नेमकं घडलं काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. खुलताबाद येथील नंद्राबादे गावाजवळील रस्त्यावर मर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.मृत्यू झालेल्यांची नावे अशोक यादवराव घुसळे आणि ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव अशी आहेत. अपघातानंतर क्रेटा कारचा चालक घटनास्थळावरून गाडी घेऊन फरार झाला. घटनेनंतर ग्रामीण वाहतूक पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करत पाठलाग सुरू केला. काही तासांत क्रेटा कार म्हैसमाळ रोडवरील जरबक्ष उर्स मैदानाजवळ सापडली. वाहन चालकाला आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं. प्राथमिक तपासानुसार आरोपी वाहनचालक सैन्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
रक्ताने माखलेली क्रेटा कार खुलताबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.हे दोघेही सकाळी रोजच्या प्रमाणे चालण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र, नंद्राबादे परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारने त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला.
वाहन चालवणारा व्यक्ती सैनिकी सेवेत असल्याची माहिती
प्राथमिक माहितीनुसार, वाहन चालवणारा व्यक्ती सैनिकी सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून अद्याप त्याची अधिकृत ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघात झालेल्या क्रेटा कारवर मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग दिसून आले असून, सदर वाहन खुलताबाद पोलिस ठाण्यात जमा करण्यात आलं आहे. अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. खुलताबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सध्या पुढील तपास सुरू आहे.