Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेममध्ये पैसे गमवल्याने चिंतेत असलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या प्रकरणी हर्सल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर गौरव चंद्रकांत पवार (वय 23 वर्षे, रा. पवननगर, टीव्ही सेंटर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गौरव पवारला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय जडली होती. त्यात त्याने जवळपास 50 हजार रुपये गमावल्याची नातेवाईकांमध्ये चर्चा होती. हा प्रकार समजल्यावर गमावलेले पैसे भरण्यासाठी गौरवला त्याच्या मामाने त्याला 40  हजार रुपये दिले होते. मात्र तरीही तो नेहमी तणावातच होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी घरी वडिलांसोबत त्याने जेवण केले. आई-वडील कामानिमित्त बीडला गेले. तर घरात एकटाच असल्यामुळे गौरव दुपारच्या वेळी हर्सूल तलाव परिसरात आला. बऱ्याच वेळ तो तलावाच्या काठावर बसून होता. मात्र काही वेळाने त्याने तलावात उडी घेतली. 


तरुणाने हर्सूल तलावात उडी घेतल्याची बाब तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षक राजेश गवळे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ याची माहिती हर्सल पोलिसांसह अग्निशमन विभागाला कळवली. त्यानुसार अग्रिशमन विभागाचे अधिकारी आर. के. सुरे, अब्दुल अजीज, संजय कुलकर्णी, हरिभाऊ घुगे, जवान सोमिनाथ भोसले, अशोक वेलदोडे, शुभम कल्याणकर, संदीप मुगशे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत गौरवला तलावातून बाहेर काढले. त्याला घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.


 कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांना धक्का


गौरवच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला होता. तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याचे वडील शेती करतात. आई गृहिणी आहे. त्याला दोन विवाहित बहिणी असून, त्याच्या आई- वडिलांना गौरव एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्यामुळे कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांना धक्का बसला आहे. तर त्याचे आई-वडील एकाकी पडले आहे. 


ऑनलाइन गेममध्ये पैसे गमवल्याने चिंतेत...


मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केल्यावर गौरवला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र त्याला याच काळात ऑनलाइन गेम खेळण्याची सवय जडली. त्यात त्याने जवळपास 50 हजार रुपये गमावल्याची नातेवाईकांमध्ये चर्चा होती.  त्यामुळे तो चिंतेत होता. हा प्रकार समजल्यावर गमावलेले पैसे भरण्यासाठी गौरवला त्याच्या मामाने त्याला 40  हजार रुपये देखील दिले. पण असे असताना देखील गौरव चिंतेत होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


संतापजनक! भटक्या श्वानास चाकूने भोसकले, तडफडत सोडला प्राण; घटना सीसीटीव्हीत कैद