छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचं छत्रपती संभाजीनगर पाहायला मिळालं. याशिवाय कल्याण, वाशिम आणि भंडारा येथे देखील परीक्षेत तांत्रिक अडचणी दिसून आलं. या परीक्षेतील गोंधळामुळं विद्यार्थींनी कोर्टाच्या आवारात आंदोलन सुरु केलं.या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) दाखल झाले. याशिवाय कल्याणमधील विद्यार्थ्यांसोबत अभिजीत दिपके यांनी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला.
अभिजीत दिपके काय म्हणाले?
मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत राज्यभर गोंधळ झाला आहे. छत्रपती संभाजीनगरचं नाही तर नांदेड, कल्याण, ठाणे, नाशिक, गोंदियामध्ये ऑनलाइन परीक्षेत गोंधळ होत आहे, की बोर्ड काम करत नाही, सर्व्हर काम करत नाही. 10 मिनिटात लॉग आऊट होऊन जात आहे. म्हणजेच एका शिफ्टमध्ये असलेले विद्यार्थी फेल झाले. एवढा सगळा गोंधळ असताना ही परीक्षा कशी होऊ शकते, त्यामुळं ही परीक्षा पुन्हा घेतली गेली पाहिजे, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं. हा मुद्दा फक्त संभाजीनगरचा राहिलेला नाही, राज्याचा मुद्दा झाला आहे. जोपर्यंत फेरपरीक्षा घेण्याबाबत नोटिफिकेशन काढलं जात नाही आणि विद्यार्थ्यांना हार्डकॉपी मिळाली पाहिजे. परीक्षा देणारे विद्यार्थी बसून राहणार असतील तर मी देखील बसून राहणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं. दिल्लीत 35 दिवस जंतरमंतरवर बसलो होतो, आता हेच आपलं जंतर मंतर असं दिपकेंनी म्हटलं. मुलांचा ऑनलाइन परीक्षेवर विश्वास नाही, ऑफलाइन परीक्षा झाली पाहिजे, असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक पदाच्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला.सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगरमधील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली.लांबून आलेल्या परीक्षार्थींना अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणीचा फटका बसल्यानं केंद्रावर संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही परीक्षार्थींनी गोंधळ घातल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी परीक्षा पुन्हा घेतली जाणार की परीक्षार्थींना अतिरिक्त वेळ दिला जाणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तांत्रिक बिघाडाचा फटका परीक्षार्थींना बसला असून आता परीक्षा प्रशासन काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कल्याण बाजार समितीमध्ये सुरु असलेल्या परीक्षेत गोंधळ झाला, यानंतर विद्यार्थ्यांनी अभिजीत दिपकेंना व्हिडिओ कॉल केला.
नेमका वाद कशावरुन?
मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाची डिसेंबरला 2025 जाहिरात निघाली होती.महाराष्ट्रामध्ये 1380 जागा आहेत.26 एप्रिलला पूर्व परीक्षा झाली. एक महिन्यात मेन्स होती.ती साडेतीन महिन्याने झाली. आज हायकोर्ट लिपिक पदासाठी आज टंकलेखन परीक्षा होती. ही परीक्षा 20 मार्कांची असून वेळ 10 मिनिटं होती. यामध्ये उमेदवारांना लीगल पेसेज टाइप करायचा होता. परीक्षा सुरु असातना सॉफ्टवेअरमध्ये ग्लीचेस आले. कीबोर्ड लहान मोठे होते. कीपॅड वरील की दबत नव्हत्या. स्क्रीन दिसत नव्हती. सगळ्यांचा लॉगीन सेम टाईमला झालं नाही . त्यामुळे आपापसात गोंधळ झाला. एकूण शब्द आणि गाळलेले शब्द याची तुलना झाली नाही. अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना आल्याची माहिती आहे.
