Gram Panchayat Election Results Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 16 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या होत्या. या सर्वांचे निकाल लागले असून, जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. 16 पैकी सर्वाधिक 4 ग्रामपंचायतीवर भाजपने विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर, शिवसेना (शिंदे गट) दोन नंबरचा पक्ष ठरला असून, शिंदे गटाला 3 ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे.
- भाजप: 04
- शिंदे गट: 03
- उद्धव ठाकरे गट: 1
- अजित पवार गट: 03
- शरद पवार गट: 00
- काँग्रेस: 01
- मनसे: 00
- इतर: 4
महत्वाच्या ग्रामपंचायतीचे निकाल...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोलवाडी गावातील ग्रामविकास पॅनलने संपूर्ण 7 जागांवर विजय मिळवला आहे. तर, सरपंच पदावर भारती रमेश कनिसे यांचा विजय झाला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अंजनडोह येथे रामेश्वर ग्रामविकास पॅनलला 9 पैकी 7 जागांवर विजय मिळाले आहे. तसेच, रामेश्वर दौलतराव शेजोळ हे सरपंच पदी निवडून आले आहेत. रामेश्वर ग्रामविकास पॅनल भाजप पुरस्कृत आहे. तर, सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिप्री येथे मंत्री अब्दुल सत्तार गटाचे सर्वच 7 उमेदवार आणि सरपंच विजयी झाले आहेत. साधनाबाई रवींद्र परदेशी या सरपंच पदी निवडून आल्या आहेत.
तर, गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा ग्रामपंचायतमध्ये एकूण 5 सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक झाली होती. ज्यात अजित पवार गटाचे समर्थक पॅनेलने सरपंच पदासह 3 उमेदवार निवडून आणले आहेत. तर, विरुद्ध पॅनेलचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच, गंगापूर तालुक्यातील वजनापूर ग्रामपंचायतमध्ये एकूण 7 सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक झाली. ज्यात शिवम अंकुश जाधव सरपंच पदासाठी निवडून आले आहे. या ठिकाणी कोणतेही पक्षाचे उमेदवार रिंगणात नव्हते. तर, याच गंगापूर तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतमध्ये एकूण 7 सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. ज्यात, भाजपा समर्थक पॅनेलला 5 जागांसह सरपंच पद मिळवता आले आहे. तर, विरुद्ध पॅनेलचे 2 सदस्य विजयी झाले आहेत. यासोबतच खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव, रसुलपुरा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीला (अजित पवार गट) विजय मिळवता आला आहे. तर, तिसगाव तांडा ग्रामपंचायत ठाकरे गट आणि तिसगाव ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: