Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) शहरात सध्या पावसाळ्यात काही दिवसापासुन अनेक भागात डोळे येण्याची विषाणुजन्य साथ (Conjunctivitis) येताना दिसत आहे. शहरातील अनेक वार्डात सध्या डोळ्याची साथ आलेल्या रुग्णांची संख्या वाढतांना पाहायला मिळत आहे. डोळयाचा विषाणुजन्य हा मुख्यत्वे अॅडिनो वायरसमुळे होतो. डोळ्याचा विषाणु ससंर्गजन्य हा सौम्य प्रकारचा ससंर्ग असला तरी देखील याबाबत जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे डोळ्याची साथ आल्यास नागरिकांनी स्टेरॉईड आईज् ड्रॉपचा (Eyes Drop) वापर टाळावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. तर डोळ्यांचा त्रास होत असल्यास तत्काळ महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी असे डॉक्टरांनी आवाहन केले आहेत. 


स्टेरॉईडचा वापर टाळा...


संसर्ग किंवा ऍलर्जीमुळे डोळे लाल होणे आणि सूज येणे यावर उपचार करण्यासाठी स्टेरॉईड याचा वापर केला जातो. शरीरात जळजळ करणारे पदार्थ बाहेर पडण्यास प्रतिबंध करून ते लालसरपणा, खाज सुटणे यासह वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर डोळ्यांच्या आजारासाठी अनेकजण याचा वापर करतात. मात्र, नागरिकांनी स्टेरॉईडचा वापर करू नयेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कारण दीर्घकाळ वापरल्याने याचे डोळ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. 


डोळे येण्याची लक्षणे-



  • डोळे लाल होणे 

  • वारंवार पाणी गळणे 

  • डोळयाना सुज येणे 

  • काही वेळा डोळयातुन चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजुस येतो. 

  • डोळयाला खाज येते. 

  • डोळे जड वाटतात व डोळयात काहीतरी गेल्यासारखे वाटते. 


डोळे आल्यास अशी काळजी घ्या



  • डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे 

  • इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसु नये. 

  • डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. 

  • घराबाहेर जाताना गॉगल वापरा.

  • संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा. 

  • आपल्या सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा. 

  • शाळा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. 

  • डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावा.

  • डॉक्टाराच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळयात टाकावी.

  • डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉपचा वापर टाळावा

  • सर्व रुग्णांनी जवळच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र,रुग्णालय येथे सपंर्क साधुन उपचार घ्यावे असे औरंगाबाद महानगरपालिका (आरोग्य विभाग) यांचे वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: