औरंगाबाद: सेफ्टी टँक मुक्त आणि शंभर टक्के ड्रेनेज कव्हरेज असलेले शहर करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) कटिबद्ध असल्याचं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी म्हटले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनाचे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. सातारा देवळाईसाठी 275 कोटींची कामाचे टेंडर देण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी अजूनही ड्रेनेज लाईन नाही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे कामे करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहर सेफ्टी टँक मुक्त व 100 टक्के ड्रेनेज कव्हरेज असलेले शहर करण्याचा मानस असल्याचे आयुक्त जी श्रीकांत म्हणाले. 


यावेळी बोलतांना त्यांनी, शिक्षण,रस्ते, लाईट,घनकचरा व्यवस्थापन, कर्मचारी प्रश्न, आरोग्य,गुंठेवारी,आदी गोष्टींवर भाष्य केले. यात प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन बाबत ते म्हणाले की, आपले शहर आता कचरा वर्गीकरण बाबत 25 टक्केवरून 90 % पर्यन्त पोहचले आहे. या करिता सर्व अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक यांचा महत्वाचा सहभाग आहे. नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी आपला कचरा वर्गीकरण करूनच द्यावा. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सक्षम आहे.


गुंठेवारी भागातील ज्या नागरिकांनी आपली मालमत्ता नियमित केली नसेल, त्यांनी ती नियमित करून घ्यावी. जेणे करून महानगरपालिकेला या भागाचा सर्वांगीण विकास करता येईल. ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट पोहचले नाही, त्या ठिकाणी व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते लाईटने कव्हर करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. महानगरपालिकेने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अवलंबला आहे. खाजगी शाळेपेक्षा आता मनपाच्या शाळा आधुनिक झाल्या आहेत. आपण स्मार्ट गुरू ऍप बनविले आहे. तसेच, ज्या नागरिकांनी अजूनही आभा कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड काढले नसेल त्यांनी ते काढून घ्यावे जेणे करून शासनातर्फे देण्यात येणारे मोफत उपचार चा लाभ घेता येईल.


विद्यार्थ्यांचा केला सत्कार 


यावेळी मनपा आयुक्त यांच्या हस्ते मनपा हर्सूल केंद्रीय प्राथमिक शाळेतील फ्रेंच भाषेत प्राविण्य मिळविलेल्या दोन विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्मार्ट गुरू या ऑनलाईन अप्लिकेशन साठी नांव सुचविन्यासाठी प्रशासक यांनी आवाहन केले होते. यात मनपाच्या 60 शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. यात हुमेरा बेगम, मनपा प्राथमिक शाळा गारखेडा यांनी या ऑनलाईन अप्लिकेशन साठी स्मार्ट गुरू हे नाव सुचविले होते. याबद्दल त्यांना गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


संबंधित बातमी: 


हद्दच झाली राव! मोबदला घेऊन पुन्हा अतिक्रमण; मग काय, महापालिकेनेही थेट 'जेसीबी' फिरवला