Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून, भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचे कार्यकर्ते आणि बीआरएसच्या (BRS) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असल्याचे समोर आले आहे. गंगापूर तालुक्यातील लासुर गावात या दोन्ही गटात वाद झाला असल्याचे समोर येत आहे. गावातील विकास कामाच्या कारणावरून हा राडा झाला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावेळी बीआरएस पक्षाचे नेते संतोष माने आणि प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते थेट आमने-सामने आले. एवढचं नाही तर दोन्ही गट थेट एकेमकांच्या अंगावर धावून देखील आहे. या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 

  
प्रशांत बंब यांच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातील लासूर स्टेशन येथे ड्रेनेज लाईनचे विकास कामे सुरु आहे. दरम्यान या कामात घोटाळा होत असून चुकीच्या पद्धतीने काम करण्यात येत असल्याचा आक्षेप बीआरएस पक्षाचे नेते संतोष माने यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे यावेळी उपस्थित असलेले प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोघांमध्ये सुरवातील शाब्दिक चकमक आणि त्यानंतर थेट पकडापकडी सुरु झाली. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाला वेगळे केले. त्यामुळे सध्या गावात पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शांतता आहे.