Chhatrapati Sambhajinagar News: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे पाच दिवसांसाठी विधान परिषदेतून निलंबन करण्यात आल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

Continues below advertisement

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक वारंवार आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा गदारोळ झाला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका व शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाचील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली.   

विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबन

चंद्रकांत पाटील म्हणाले,अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत  पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे. त्यानंतर मंगळवारी (२जुलै) भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर यासाठी आंदोलन केलं.  त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. 

Continues below advertisement

आता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज शहरातील क्रांती चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. 

अंबादास दानवेंनी केली पत्रातून दिलगीरी व्यक्त

दरम्यान, विधानपरिषदेत (Vidhan Parishad)  शिवीगाळप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)  यांचं निलंबन करण्यात आलं. विधान परिषदेतील शिवीगाळीबाबत  अंबादास दानवेंनी पत्राच्या माध्यामातून दिलगिरी व्यक्त केली आहे. या पत्रानंतर अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.  दुपारी तीन वाजता सभागृहात दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय जाहीर करणार आहे. 

हेही वाचा:

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता, सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली,विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित