छत्रपती संभाजीनगर : देशात सर्वात जास्त कांद्याचे पीक महाराष्ट्रात (Maharashtra) घेतले जाते. एकट्या महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर 25 ते 30 लाख टन कांदा (Onion) उत्पादित होतो. त्यामुळे फक्त 03 लाख टनांची निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने निव्वळ व्यापाऱ्यांना फायदा पोहचवला असून, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कांदा निर्यातीवरील बंदी सरसकट उठवा अशी मागणी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज आपल्या सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत केली आहे.
भारतात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते. एवढ्या प्रमाणात कांदा उत्पादित झाल्याने फक्त 3 लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित कांदा सहकार मंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकारी मंत्री यांच्या घरात पाठवायचा का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
अंबादास दानवेंच्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे?
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर 25 ते 30 लाख टन कांदा कांद्याचे उत्पादन निघते. यातील साधारण 13 लाख टन कांदा देशांतर्गत वापरला जातो. मग उरलेल्या 12 ते 17 लाख टन कांद्यापैकी फक्त 3 लाख टनांची निर्यात करणे हे कोणत्या न्यायात बसते? उरणारा कांदा काय केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या घरी पाठवायचा का?, शेतकऱ्यांची कांदा विक्री अटोपत आलेली आहे. असे असताना निर्यातीचा निर्णय निव्वळ व्यापाऱ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे, शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही. बंदी सरसकटच उठवायला हवी, अशी अंबादास दानवे यांनी मागणी केली आहे.
3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीची मान्यता
काल रविवार (18 रोजी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. तसेच या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन केंद्राने 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली होती.
इतर महत्वाच्या बातम्या :