Maharashtra politics: मागील काही दिवसांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजप नेत्यांकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका होतांना दिसत आहे. तर अशीच काही टीका भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट करत केली होती. त्यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील ट्वीट करून दिली आहे. तसेच गप्पा काय झोडता? महापालिका निवडणूक लावा, असेही सुनावले आहे. 


भाजपमध्ये राम उरला नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देतांना बावनकुळे म्हणाले की, "ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत असल्याचं बावनकुळे म्हणाले होते. त्यांच्या टीकेला आता दानवे यांनी उत्तर दिले आहे. 


दरम्यान. बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देतांना दानवे म्हणाले की, "ज्या माणसाकडे पक्ष नाही, चिन्ह नाही अशा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची इतकी वाट तुम्हाला बावनकुळे यांना पहावी लागते, किती ती आतुरता तुमची? याचे कारण एकच. हा आमचा नेता आजही तितकाच बलशाली आहे. 2024 च्या गप्पा काय झोडता? आपल्या क्षमतांवर एवढाच दृढ विश्वास असेल तर महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा. लोक कोणाच्या बाजूने कौल देतात ते..." असे दानवे म्हणाले. 






काय म्हणाले होते बावनकुळे? 


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?... तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे. तर देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं. औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला.  2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय, असे बावनकुळे म्हणाले. 






इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; मंत्री भुमरे-अंबादास दानवेंमध्ये थेट हमरीतुमरी