Tadoba Safari: चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. सध्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला असून, वाढत्या तापमानाचा थेट परिणाम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी वेळांवर झाला आहे. हवामान खात्याने विदर्भात उष्णतेचा हायअलर्ट दिला आहे. चंद्रपुरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने तापमानाचा पारा 44-46 अंशांदरम्यान आहे. त्यामुळे ताडोबा व्याघ्र दर्शनाकडे आता पर्यटकांनीही पाठ फिरवल्याचे दिसत आहे. (Temperature)
ताडोबा सफारीची वेळ बदलली
दरम्यान, प्रकल्प प्रशासनाने दुपारच्या सत्रातील सफारीची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे दुपारची सफारी नेहमीप्रमाणे 2:30 ते 6:30 या वेळेत न होता, आता 3 ते 7 या वेळेत होणार आहे. हा बदल दरवर्षी 1 मेपासून अमलात आणला जातो. मात्र यंदा तापमान अत्यंत वाढल्याने सुमारे आठ दिवस आधीच ही सुधारणा लागू करण्यात आली आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्यात वाघ व अन्य वन्यजीव नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे व्याघ्र दर्शनाची संधी अधिक असते. मात्र तीव्र उन्हामुळे पर्यटकांना त्रास होऊ नये, यासाठी ही वेळ पुढे ढकलण्यात आली आहे.
यंदा आठवडाभरापूर्वीच सफारीच्या वेळेत बदल
ताडोबात एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिल्या आठवड्यासाठी करण्यात आलेले बुकींग पर्यटकांनी रद्द केले आहेत. ताडोबात आधीच पर्यटक खुल्या जीपमधून जंगल सफारीसाठी जातात. मात्र आता उन्हाचा ताप वाढल्याने आता पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी जाणं पसंत करत आहेत. अनेकदा शाळांना सुट्ट्या लागल्याने ताडेबासाठी पर्यटक जातात. मात्र, यंदा उन्हाचा प्रचंड दाह वाढल्याने पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने दररोजच्या दुपारच्या सत्रातील सफारीच्या वेळेत केला आहे. यंदा आठवडाभरापूर्वीच ही वेळ आली आहे.
पर्यटकांनी सफारीसाठी निघण्यापूर्वी हवामानाची माहिती घेणे, भरपूर पाणी प्यावे, टोपी व सनग्लासेस वापरणे आणि हलक्या कपड्यांमध्ये सफारीसाठी जाणे, असे आरोग्यविषयक सल्लेही प्रशासनाने दिले आहेत.ताडोबामधील स्थानिक मार्गदर्शक, ड्रायव्हर आणि पर्यटन व्यावसायिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.उन्हाळ्यात पर्यटनाची मागणी वाढते. पण यंदा खूप लवकर गरमी जाणवतेय. पर्यटकांनाही याचा त्रास होतोय. वेळ पुढे ढकलल्यामुळे आता थोडा दिलासा मिळेल. असे एक मार्गदर्शक म्हणाले.
हेही वाचा:
मोठी बातमी! भारताच्या BSF जवानाने ओलांडली 'बॉर्डर'; पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात