Chandrapur News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) संकटात आहे. कारण यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशातच महावितरणकडून (Mahavitran) वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचं चित्र दिसत नाही. त्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) या आक्रमक झाल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप लावून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या आत केले आहे. 


प्रशासनाची उडाली तारांबळ


आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा येथील महावितरणच्या कार्यालयाला कुलूप लावून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या आत बंद केले आहे. सध्या वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची थ्री फेज लाईन बंद आहे. सध्या चना लागवडीचा हंगाम सुरु आहे. अशातच महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  तात्काळ थ्री फेज लाईन सुरु करावी अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बंद केल्यामुळं प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 


तब्बल 3 तासानंतर उघडले कार्यालयाचे कुलूप


दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर आमदार धानोरकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना 2 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तब्बल 3 तासानंतर कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले आहे. 


राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट


राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट पाहायला मिळत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी पडलेला पाऊस आणि वीजेची वाढलेला मागणी याचा फटका आता राज्याला बसत आहे. लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्राला आता लोडशेडिंगचा फटका बसणार असून, मागणी वाढल्यानं आणि तुटवडा निर्माण झाल्यानं महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळं राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी आता रोज लोड शेडिंगला सामोरं जावं लागत आहे. राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याचं दिसून आलं. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा वाढला आहे. याचा परिणाम हा विजेचा तुटवडा निर्माण होण्यावर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे. विजेची मागणी जशी वाढेल त्यानुसार हा लोडशेडिंग करण्यात येत आहे. कधी एक तास तर कधी दोन तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : दुष्काळी परिस्थितीत लोड शेडिंग वाढलं, नंदुरबार जिल्ह्यात पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड