Chandrapur : वाघ (Tiger) म्हटला की साऱ्यांचाच अंगाचा थरकाप उडतो. तो दबक्या पावलांनी कधी येतो आणि कधी शिकार करून घेऊन जाईल याचा कोणालाच पत्ता नसतो. वाघाचा दराराच एवढा असतो की भलेभले त्याला घाबरतात. पण चंद्रपूरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक वेगळाच प्रसंग घडलाय, या ठिकाणी वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ समोर आला आहे. चंद्रपूर शहरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांनी शनिवारी आपल्या कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद केला आहे.
वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ समोर
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ समोर आला आहे. मोहर्ली परिसरातील पाणवठ्यावर छोटा दडियल या वाघाने एका रानगव्यावर दबक्या पावलांनी येऊन हल्ला केला, त्यावेळी रानगवा वाघाच्या तावडीतून निसटण्याचा शर्तीने प्रयत्न करत होता, वाघाने रानगव्याची मान आपल्या जबड्यात अतिशय मजबुतीने धरली होती. मात्र अचानक रानगव्याच्या कळपातील 'अल्फा' नराने मदतीसाठी वाघावरच प्रतिहल्ला चढविला, 'अल्फा' नराच्या ताकतीचा अंदाज असल्याने छोटा दडीयल वाघाने शिकार सोडून पळ काढला, त्यामुळे अल्फा नर गव्याच्या ताकतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!
वाघ आणि रानगवा समोरासमोर असतील तर आपण म्हणू रानगवा त्याला घाबरेल. पण या व्हिडीओत मात्र उलटचं झालं. भलामोठा वाघच या गव्याला घाबरला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.
मऱ्हेगावात वाघाचा धुमाकूळ
चंद्रपूर मूल तालुक्यातील मऱ्हेगाव येथे वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाने आज पहाटे गावात शिरून केलेल्या हल्ल्यात 3 पाळीव जनावरांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी झाले आहे. काल दुपारी याच गावातील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात आशिष दुधकुवर (17) हा तरुण किरकोळ जखमी झाला, तर वाघाच्या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वनविभागाने या भागात कॅमेरा ट्रॅप लावून गस्त सुरू केली आहे.
यापूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल
यापूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, जिथे भला मोठा सिंह मांजराची शिकार करायला गेला, पण तो सिंह रिकाम्या हातीच मागे परतला. Mack & Becky Comedy ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. सिंह आपला पंजा फिरवून मांजरीला पकडण्याचा प्रयत्न करत होता. तो काचेचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न करताना दिसतो. मांजरीला पाहून जोरजोरात डरकाळ्याही फोडतो. तर दुसरीकडे मांजर मात्र घरात निवांत बसून सिंहाची जणू मजाच पाहत राहते.
हेही वाचा>>>