Chandrapur Crime: पतीच्या आजारपणाला आणि घरातील वाढत्या आर्थिक विवंचनेला कंटाळून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पती दाखल असलेल्या खाजगी रुग्णालयातच पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयुरी पंधरे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. (Sucide)

Continues below advertisement

नेमके घडले काय? 

चंद्रपूर जिल्ह्यातील तुकूम भागात मयुरी पंधरे (वय 28) यांचे पती कंबर दुखीच्या आजारामुळे काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल होते. मयुरी रोज त्यांची देखभाल करण्यासाठी रुग्णालयात जात होत्या. गुरुवारी त्या पतीला भेटायला गेल्या आणि थेट रुग्णालयातीलच एका रिकाम्या खोलीत शिरल्या. काही वेळातच त्यांनी स्वतःच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती उपचार घेत असलेल्या त्याच हॉस्पिटलमध्ये पत्नीने आपलं जीवन संपवल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पतीचं दीर्घ आजारपण, वारंवार होणारा खर्च आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक विवंचना या सर्व गोष्टींमुळे मयुरी मानसिक तणावाखाली होत्या आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे.

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल 

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पतीचं दीर्घ आजारपण, वारंवार होणारा खर्च, घरची जबाबदारी आणि वाढत चाललेले कर्ज या सर्व गोष्टींनी मयुरी मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. उपचार घेत असलेल्या पतीसमोरच पत्नीने असा निर्णय घेतल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 

Continues below advertisement

बीडमध्ये लव्ह ट्रँगल!11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड

बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं. महत्त्वाची बाब म्हणजे या अपहरणामागे तरुणाच्या जुन्या प्रेयसीचाच हात होता. सुपारी देऊन तिनं तरुणाचं अपहरण केलं. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि तरुणाची 14 तासात सुटका केली. तब्बल 11 वर्षे आपल्या संसारात रमलेल्या जुन्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी त्याच्या जुन्या प्रेयसीने हे कृत्य केल्याने एकाच वेळी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.आधी मारहाण, मग अपहरण आणि सुटकेचा थरार अशी काहीशी ही घटना घडली बीड जिल्ह्यात. दहा ते बारा जणांच्या टोळक्याचा मार खाणाऱ्या तरुणाचे नाव आहे नागनाथ नन्नवरे. या मारहाणीनंतर त्याचं अपहरण झालं. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनीही तपासाची चक्रं फिरवली आणि 14 तासांत अपहरण झालेल्या नागनाथची सुटका झाली.