Chandrapur Accident News : चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अचानक जनरेटरचा मोठा स्पोट (Accident News) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिलांसह सात जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील विसलोन गावातील ही घटना घडली आहे. घटनेतील दोन गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur News) दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान जनरेटरमधील डिझेल संपल्यामुळे कोणीतरी त्यात डिझेल टाकले. मात्र जनरेटर गरम असल्यामुळे डिझेल टाकताना त्याचा स्फोट झाला. यावेळी जनरेटरजवळ त्यावेळी उभ्या असलेल्या चार महिलांसह सात जण यात जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरु असून या घटनेमुळे विसर्जनाचा मिरवणुकीला गालबोट लागले आहे.
Buldhana Visarjan Rada : विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक, दोन गटात तणाव
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावांमध्ये काल रात्री (4 ऑक्टॉबर) जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीनंतर गावात दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. मात्र दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना अटक केल्याशिवाय विसर्जन मिरवणूक पुढे नेणार नाही, अशी काहीशी भूमिका विसर्जन मिरवणूक मंडळांनी घेतल्याने सात मंडळांचे विसर्जन थांबले होते. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे. सकाळी पाच वाजता पोलिसांनी देवी विसर्जन मंडळाची समजूत काढत सकाळी पाच वाजता देवीचे विसर्जन केलं. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून दंगा काबू पथक व मोठा पोलीस फौज फाटा तैनात आहे.
Wardha Crime News: वर्ध्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी हत्या
वर्ध्याच्या शेकापूर इथं मुलाने वडिलाची घरगुती वादातून हत्या केली तर पुलगाव इथं तीन युवकांनी एका युवकाला संपविल्याची घटना उघडकीस आलीय. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन्ही हत्याच्या घटनातील चार आरोपीना अटक करण्यात आलीय. शेकापूर इथल्या मृतकाचे नाव शालीक तिजारे तर पुलगाव इथल्या मृतकाचे नाव अक्षय माहोरे असे आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यात झालेल्या दोन खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आणखी वाचा