Capricorn Horoscope Today 17th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. स्थानिकांना राजकारणात (Politics) यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तसेच संमेलनांना संबोधित करण्याची संधीही मिळेल. सर्वजण खूप आनंदी दिसतील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नोकरीत कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी एकदा चर्चा करा. वैवाहिक जीवनात (Married Life) गोडवा दिसून येईल. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Investment) करायची असेल तर त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
वाणीत गोडवा ठेवा
नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. वैवाहिक जीवनात वाणीत गोडवा ठेवा. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. यामध्ये तुमचे भाऊ तुम्हाला मदत करु शकतील. नोकरदार व्यक्तीने कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीत लक्ष घालू नका.
कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांचा दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील शांततेसाठी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन पुढे जाणेच फायद्याचे ठरेल. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत घालवा, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या.
आज मकर राशीचे आरोग्य :
मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या वरचढ राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.
मकर राशीसाठी आजचे उपाय :
तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात ठेवा आणि पाच जपमाळ 'ओम श्रीं श्रीं नम:' मंत्राचा उच्चार करुन धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :