Capricorn Horoscope Today 16th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस नशीब तुमच्याबरोबर असेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली वेळ आहे. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. घरातील आनंदाचे वातावरण तुमचा तणाव कमी करेल.
दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल
मकर राशीच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल, तुमची मेहनत, समर्पण आणि उत्साह पाहून तुमच्या वरिष्ठांना खूप आनंद होईल. आजचा दिवस तुमच्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. दिवसभरात तुम्ही भविष्यासाठी चांगल्या योजना आखू शकता.
आज तुम्हाला वैवाहिक सुखाच्या (Married Life) दृष्टिकोनातून काही अनोखी भेट मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनरवर जाऊ शकता. आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. घर, इमारत इत्यादी खरेदी करण्याची योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. नातेवाईकांकडून चांगली सुवार्ता समजेल. भावंडांविषयी कौतुक वाटेल. धार्मिक गोष्टीत उत्साह टिकून राहील.
आज मकर राशीचे आरोग्य
मकर राशीचे लोक कामाच्या वेळी काही गोष्टींमुळे मानसिक तणावात राहू शकतात. दररोज सकाळी चालणे आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.
मकर राशीसाठी आजचे उपाय
मंदिरात किंवा कोणत्याही व्यक्तीला सुके नारळ अर्पण करा आणि संध्याकाळी भगवान शंकराचे ध्यान करा.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 12 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :