Ravikant Tupkar : भाजपचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली हे मला समाज माध्यमातून समजले. पण मला अद्याप कोणत्याही भाजपच्या नेत्याचा फोन किंवा कार्यकर्त्याने विचारणा केली नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केलं. त्यामुळं आशिष देशमुख यांनी जरी ऑफर दिली असेल तरी ती माध्यमातूनच आहे. त्यामुळं ऑफर आली तरच मी त्यावर वक्तव्य करेल असे तुपकर म्हणाले.


आशिष देशमुख नेमकं काय म्हणाले होते?


भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं असं म्हटलं होतं.  विदर्भातील शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकरी हितासाठी कमीलीची कामं करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असं देशमुखांनी म्हटलंय. आशिष देशमुख हे भंडाऱ्यात आले हते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यमान नेतृत्वार थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत बहुजन समाजाचा स्वाभिमान दुखावला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना असल्याचे आशिष देशमुख म्हणाले. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी ऑफर देशमुख यांनी दिली आहे. यावर रविकांत तुपकर यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडून रविकांत तुपकर यांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. याला खुद्द रविकांत तुपकर यांनी दुजोरा दिला आहे. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणालेत. त्यामुळं आता तुपकर स्वाभिमानीत राहणार की वेगळा पर्याय निवडणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. अशातच आता आशिष देशमुखांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. याबाबत आपल्याला कोणत्याही भाजप नेत्याने विचारणा केली नसल्याचे तुपकरांनी म्हटलं आहे. मात्र, आता जर भाजप नेत्यांनी विचारणा केली तर तुपकर भाजपची वाट धरणारी की अन्य कोणत्या पक्षात जाणार की स्वाभिमानीतच राहणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Ashish Deshmukh : रविकांत तुपकरांनी भाजपमध्ये यावं, आशिष देशमुखांनी दिली खुली ऑफर