Buldana : बुलढाण्यात शिवसेनेने केलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू असताना या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते पोहोचले आणि या ठिकाणी पोलिसांसमोरच तुफान राडा झाला. जवळपास पंधरा मिनिटे हा प्रकार चालला. यावरून मात्र आता शिंदे गट आणि शिवसेना बुलढाण्यात आमने-सामने उभी टाकली असल्याचे चित्र आहे.
बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बंदिस्त सभागृहात शिवसेनेने आपल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. हा कार्यक्रम एक वाजता सुरू झाला. आणि काही वेळातच बुलढाण्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड आणि त्यांचे 40 ते 50 सर्मथक या ठिकाणी पोहचले. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांशी वादावादी झाली...आणि याचं रुपांतर थेट हाणामारीत सुरू झालं. यावेळी मंचावर शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले , शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर , जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत , शिवसेना नेते छगन मेहेत्रे उपस्थित होते.
शिंदे गटाचे कार्यकर्ते थेट सतेज जवळ जाऊन खुरच्यांची तोडफोड करत असताना नेत्यांनाही धक्काबुकीं करण्यात आली. हा सर्व राडा 20 मिनिटे पोलिसांच्या समोर सुरू होता. पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त कुमक मागवून यावेळी शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज ही केला....व तेथून या गटाला पिटाळून लावलं.....!
इतका सर्व राडा झाल्यानंतर आम्ही शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला. याविषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी या घटनेचा साधा निषेधही करणार नाही. कारण मी याआधीही शिवसेनेच्या या लोकांना सांगितलं होतं की तुमचा पक्ष तुम्ही सांभाळा. परंतु आमचा कुठेही नामोल्लेख येता कामा नये. ही सर्व मंडळी आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विषयी अभद्र टीका करतात आमच्या आमदारांविषयी बोलतात असं आम्ही कधीही खपवून घेणार नाही.
बुलढाण्यात आता दोन आमदार आणि एक खासदार हे शिंदे गटाचे आहेत त्यामुळे आता जिल्ह्यात शिंदे गटाचं वर्चस्व बघायला मिळत आहे. परंतु यातच काही जुने शिवसैनिक एकत्र येऊन अनेक ठिकाणी मेळावे घेत आहेत. त्यामुळे अशा मेळाव्यात या दोन आमदार आणि एका खासदाराविषयी अनेकदा अभद्र टिप्पणी किंवा टीका होताना दिसते ......आणि नेमकं हेच कारण आजच्या वादाच आहे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी शेगाव ,खामगाव, बुलढाणा, मेहकर या ठिकाणी अनेक मिळावे घेतलेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिंदे गटांच्या या आमदार आणि खासदारांचा "गद्दार म्हणून असा उल्लेख केला" आणि आपल्या जिल्ह्यात आपल्यालाच गद्दार म्हटल्या जात असल्याबद्दलची ही टीका शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे आणि यातूनच हा आजचा वाद उफाळून आल्याचं बोललं जातं आहे. याआधीही शिंदे गट हा गुवाहाटीला असताना नरेंद्र खेडेकर यांनी बुलढाण्यात मेळावा घेतला होता. त्यावेळेस सुद्धा शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने येऊन तणाव निर्माण झाला होता. मात्र यापुढे भविष्यात बुलढाण्यात आता शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने उभे ठाकल्याचा चित्र आहे. हा राडा झाल्यानंतर शिवसेनेचे नेते पोलीस अधीक्षकांना भेटायला गेले त्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर सर्व फुटेज तपासून कारवाई करण्यात येईल आश्वासन दिल मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.....किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.