Sanjay Gaikwad Defender Car: बुलढाणा शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव वाढत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कोणत्या कामाच्या कमिशनमधून कोट्यवधी रूपयांची डिफेंडर कार (Land Rover Defender) आणली? असा प्रश्न उपस्थित करून खळबळ उडवून दिली होती. संजय गायकवाड यांच्यावर आरोप होताच डिफेंडर कारचा खरा मालक ठेकेदार निलेश ढवळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.     

Continues below advertisement

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, डिफेंडर कार एका कंत्राटदाराच्या नावावर असून ती कार कोणत्या कामातील कमिशनमुळे गायकवाडांना मिळाली आहे, याची चौकशी व्हावी. “जर बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच उमेदवार असेल तरच युती शक्य आहे. मतदारांना वेश्यापेक्षा वाईट म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनतेने नाकारले पाहिजे. त्यामुळे भाजपचाच विचार व्हावा अन्यथा युती होणार नाही,” असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Sanjay Gaikwad Defender Car: ठेकेदार निलेश ढवळेंचा खुलासा

डिफेंडर कारचे मालक म्हणून ठेकेदार निलेश ढवळे यांनी माध्यमांपुढे स्पष्ट केले की, ही कार त्यांची आहे आणि त्यांनी ती कर्ज काढून खरेदी केली आहे. त्यानुसार, त्यांनी कोणत्याही कमिशन स्वरूपात कार आमदार गायकवाड यांना दिली नाही. तसेच, संजय गायकवाड हे त्यांचे नातेवाईक असून गाडी तात्पुरती वापरण्यासाठी त्यांना दिली आहे. ढवळे यांनी सांगितले की, गाडीवर आमदाराचा सिम्बॉल लावलेला आहे, तो इम्प्रेशनसाठी असून दिवाळीनंतर गाडी परत घेणार आहेत. चौकशी झाली तरी ते सामोरे जाण्यास तयार आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे. 

Continues below advertisement

Sanjay Gaikwad Defender Car: आमदार संजय गायकवाड यांचे स्पष्टीकरण

आमदार संजय गायकवाड यांनीही या प्रकरणावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, डिफेंडर कार निलेश ढवळे यांच्या मालकीची आहे, जे त्यांचे नातेवाईक तसेच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्वतः ही गाडी काही काळ वापरण्यासाठी घेतली आहे. आमदार गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या आरोपांवर पलटवार करताना “त्या आरोपांवर उत्तर देण्याची गरज नाही, कारण ते कपटी आहेत,” असे म्हटले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

आणखी वाचा 

Bharat Gogawale on Raj Thackeray Uddhav Thackeray: ...म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत; भरत गोगावलेंचा उध्दव-राज यांना टोला; म्हणाले, कितीही एकत्र आले तरी...