बुलढाणा अनेकदा एखाद्या देवस्थानला आपण गेल्यावर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो आपलं वाहन कुठे पार्क करायचं....? मात्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानाच्या नियोजनामुळे आता शेगावात मंदिर परिसरात अतिशय हायटेक आणि ऑटोमोटेड आणि प्रशस्त अस वाहनतळ उभारण्यात आले आहे...

Continues below advertisement

संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला येणाऱ्या देश विदेशातील भक्तांच्या सोयीसाठी संस्थानाने उभारलेल हे वाहनतळ अर्थात पार्किंग....चार एकर जागेत अतिशय प्रशस्त व भव्य अस हे वाहनतळ आहे. सगळीकडे अतिशय स्वच्छ्ता...पाच हजार कार व तीन हजार दुचाकीच दिवसभरात आवागमन होईल अशी क्षमता...संपूर्णतः ऑटोंमोटेड.... वाहन पार्क करण्यासाठी  A ते Z पर्यंत वेगवेगळे झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये 200 कार पार्क करता येईल अशी क्षमता आहे. अत्यंत सोपी अशी कार लोकेशन आयडेंटीफिकेशन सिस्टीम...परिसरात अत्यंत स्वच्छता असलेलं हे अशा प्रकारचं देशातील देवस्थानात एकमेव अस पार्किंग असल्याचं बोललं जात. त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली असून मंदिराच्या अगदी जवळ असल्याने तुमच्या वाहनातून उतरल्यावर सहज दर्शनाची सोय करण्यात आली आहे. 

देशातील  पाहिलं हायटेक वाहनतळ वैशिष्ट्ये काय?

  • पूर्णतः हायटेक व ऑटोमोटेड.
  •  पार्किंगची क्षमता व किती पार्किंग vacant आहे हे दिसणारे डिजिटल फलक.
  • डिजिटल कार लोकेशन आयडेंटीफिकेशन सिस्टीम.
  • चार एकर जागेत प्रशस्त व अतिशय स्वच्छ 
  •  एकावेळी पाच हजार कार , तीन हजार बाइक्स व वीस बसेस क्षमता
  • वाहनाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक , सीसीटिव्ही कॅमेरे.
  • वाहनचालकांसाठी विश्रांती गृह, स्वच्छ्ता गृह.
  •  प्रवेश व निकास वेगवेगळ्या मार्गाने असल्याने सहज निर्गमन..

अशा प्रकारचं पार्किंग बघून अनेक भाविक ही आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. तर अमेरिकेतील भाविकांना ही याची भुरळ पडली आहे.मूळचे परभणी जिल्ह्यातील मात्र अमेरिकेतील अटलांटा परिसरात स्थाईक झालेल्या भाविकांची या बाबत प्रतिक्रिया बोलकी आहे.अमेरिकेतील योगेश जाधव आपल्या पत्नीसह दर्शनाला आले असता ते म्हणाले की आम्ही वीस वर्षांपासून अमेरिकेत राहतो मात्र तिकडे ही अशाप्रकारच पार्किंग त्यांनी बघितलं नाही.

Continues below advertisement

हे ही वाचा :

शेगावातील 'आनंद सागर'मधील अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुलं; अध्यात्मिक अनुभूतीसाठी भाविकांची गर्दी