Prataprao Jadhav on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून (Buldhana Constituency) लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी, असं खुलं आव्हान शिंदे गटाचे खासादर प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav ) यांनी दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याच्या सभेत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टिकेला प्रतापराव जाधवांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनांच आव्हान दिलं आहे.


मी शिवसेनेतूनच लढणार


बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. हिंमत असेल तर बुलढाण्यातील गद्दारांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखवावी अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याला खासदार प्रतापरावं जाधवांनी खुलं आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर उद्दव ठाकरेंनी माझ्या विरोधात बुलढाण्यातूव लोकसभा निवडणूक लढवावी असे जाधव म्हणाले. मी पुढची लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढणार आहे. भाजकडून लढण्याचा विषय येतो कुठे. आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो असल्याचे प्रतापराव जाधव म्हणाले.


भाजप आमचा जुना मित्रपक्ष, त्यांच्यासोबतच निवडणुका लढवणार


भाजप आमचा जुना मित्रपक्ष आहे. जुन्या मित्रपक्षाला सोबत घेऊन आम्ही याआधीच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत आणि इथून पुढं येणाऱ्या सगळ्या निवडणुका देखील आम्ही भाजपसोबतच लढणार असल्याची माहिती यावेळी प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यामुळं भाजपकडून लढण्याचा प्रश्न येतो कुठं? असा सवाल प्रतापराव जाधवांनी केला आहे.


एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या 12 खासदारांच्या गटात प्रतापराव जाधव


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या 40 आमदारांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठून राज्यात राजकीय भूकंप घडवून आणला होता. त्यानंतर 19 जुलै 2022 ला शिवसेनेच्या 12 खासदाररांनी गट तयार केला. या 12 खासदारांनी लोकसभा सभापतींना पत्र देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या 12 खासदारांमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचादेखील समावेश होता. त्यानंतर प्रतापराव जाधवांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाई  केल्यामुळे त्यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या बातम्या:


खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अन्य सात जणांवर कारवाई