बुलढाणा : अवैध मार्गाने तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना बुलढाणा वनविभागाच्या सहायक वन संरक्षक अधिकारी (ACF) अश्विनी आपेट (Ashwini Apet) हिला रंगेहात पकडण्यात आलं. तर तिच्यासोबत लिपिक अमोल मोरे हादेखील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला. अश्विनी आपेट हिची सध्या चौकशी सुरू आहे. 

Continues below advertisement

अश्विनी आपेट ही 2016 बॅचची रेंज फॉरेस्ट ऑफिसर असून गेल्या वर्षीच तिला सहायक वन संरक्षक अधिकारी बढती मिळाली होती. अश्विनी आपेट हिच्याबद्दल पैशासंबंधी अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचल्या होत्या. परंतु वरिष्ठांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. आता ती लाच घेताना रंगेहात सापडली

वनविभागाच्या हद्दीतील तोडलेल्या झाडांची वाहतून करण्यासाठी अश्विनी आपेट हिने 30 हजारांची लाच मागितली होती. त्यापैकी अॅडव्हान्स म्हणून 15 हजार स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. अश्विनी आपेट हिच्याबद्दल लाचलुचपत विभागाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

Continues below advertisement

सहायक वन संरक्षक अधिकारी अश्विनी आपेट आणि लिपिक अमोल मोरे यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. 

Ashwini Apet Bribe News : लाचखोर अधिकारी म्हणून ओळख

अश्विनी आपेट ही बुलढाणा वनविभागात सहायक वन संरक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या विभागात ती लाचखोर अधिकारी म्हणून ओळखली जायची अशी माहिती सूत्रांनी दिली. हाताखालच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना ती पैसे गोळा करण्यासाठी दबाव टाकायची अशी माहिती आहे. त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी झाल्याची माहितीही समोर येत आहे.

अश्विनी आपेट हिची सुरुवातीची पोस्टिंग बीड जिल्ह्यातील केज रेंजमध्ये झाली होती. त्यावेळीही तिने असे अनेक प्रकार केल्याची चर्चा आहे. त्यावेळी काही लोकप्रतिनिधींनीही तिची तक्रार वरिष्ठ स्तरावर केली होती. पण नंतर हे प्रकरण मिटवण्यात आल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा: