Buldhana: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा आटोपून परतत असलेल्या भाविकांच्या एसटी बसला चिखलीजवळ अपघात झाला. ही बस चिखली तालुक्यातील महाबीज कार्यालयासमोर असलेल्या दुभाजकावर आदळून पलटी झाली. ही घटना आज पहाटे सुमारे 4 वाजता घडली.  या अपघातात सुमारे 30 प्रवासी भाविक जखमी झाले असून  कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Accident)

Continues below advertisement


ही एसटी बस पंढरपूरहून खामगावच्या दिशेने जात होती. बसमध्ये एकूण 51 भाविक प्रवास करत होते. पहाटे चार वाजताच्या सुमारास चिखली शहराजवळ महाबीज कार्यालयाच्या समोर नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. बसच्या समोरच्या भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला असून अपघाताची तीव्रता देखील अधिक होती.


नेमकं घडलं काय?


आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर आषाढी वारी आटोपून खामगावकडे जात असलेली एसटी बस बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीजवळ महाबीज कार्यालयासमोर आली असताना बस दुभाजकावर आदळून पलटी झाली. या बसमध्ये 51 भाविक प्रवास करत होते. या भीषण अपघातात सुमारे 30 प्रवासी जखमी झाले.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना बाहेर काढलं आणि चिखली व बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. बसचं मोठं नुकसान झालं असून अपघाताची कारणमीमांसा पोलिसांकडून सुरू आहे. 


अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना तत्काळ बाहेर काढले आणि चिखली तसेच बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले. जखमींपैकी काहींना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पंढरपूर यात्रा आटोपून भाविक घरी परतत असताना हा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे.


तेलंगणात फार्मा फॅक्ट्ररीतील मृतांची संख्या 42 वर


तेलंगणा फार्मा कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे. 8  जण अजूनही बेपत्ता आहेत. अपघातानंतर 6 दिवसांनीही शोध मोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवार आणि रविवारी अपघातस्थळावरून काही हाडे आणि जळालेले अवयव सापडले. 30 जून रोजी सकाळी सव्वा आठ ते साडे नऊच्या दरम्यान, साडे आठ ते साडे नऊ दरम्यान पासुमिलाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीजमध्ये हा अपघात झाला. घटनेच्या वेळी कारखान्यात 150 लोक होते, स्फोट झाला त्या ठिकाणी 90 लोक उपस्थित होते. त्या दिवशी बचाव आणि वैद्यकीय पथकाने 31 मृतदेह बाहेर काढले.


हेही वाचा


Telangana Chemical Factory Blast: तेलंगणा फार्मा फॅक्टरीतील मृतांची संख्या 42 वर, अजूनही 8 जण सापडेनात; घटनास्थळी हाडं, मानवी सांगाडे मिळाले