भंडारा: भंडाऱ्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विविध प्रलोभन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात ती गर्भवती राहिली. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आली. मात्र, समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. याची माहिती होताचं भंडारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी पुढाकार घेत कुटुंबीयांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. वेदांत हिवराज आडवे (19) असं पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नावं आहे.
गोंदियामध्ये आधी आईचा खूननंतर 7 महिन्यांच्या बाळाची केली विक्री
गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्याच्या खजरी शेतशिवारात सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या खून प्रकरणाचा थरारक उलगडा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. केवळ खूनच नव्हे तर मृत महिलेच्या 7 महिन्याच्या मुलाची विक्री करण्यामागील टोळीचा भांडाफोड करीत 7 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 3 ऑगस्ट रोजी खजरी शेतशिवारात महिलेचा मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर खजरी येथील पोलीस पाटील इंद्रराज राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली. अन्नु नरेश ठाकुर (21) रा. भिलाई, दुर्ग, छत्तीसगड असल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपी अभिषेक सिद्धार्थ तुरकर (36) रा. भिलाई, ह.मु. डोंगरुटोला गोरेगाव, गोंदिया हा अन्नुशी अनैतिक संबंधात होता. मोठ्या कर्जामुळे पैशांच्या गरजेतून त्याने पत्नी पूनम तुरकर, नातेवाईक प्रिया तुरकर आणि साथीदार चांदणी रा. नेहरू नगर, भिलाई यांच्या मदतीने कट रचला. 2 ऑगस्टला अभिषेकने अन्नुला खजरी शेतशिवारात नेऊन चाकूने हत्या केली. नंतर तिच्या 7 महिन्याचा मुलगा धनराज याचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून मुलाची विक्री करण्यात आली. या प्रकणातील खून करणारे आणि बाळाची खरेदी करणाऱ्या 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.