Buldhana News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व कार्यकर्त्यांनी मराठी न बोलता येणाऱ्या खामगाव येथील बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरला चांगलेच धारेवर धरलंय. काल (28 फेब्रुवारी) खामगाव येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत मराठीच्या मुद्द्यावर चांगलाच गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. खामगाव येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी बोलता येत नाही. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे घरकुल योजना, प्रधानमंत्री किसान योजना आणि लाडक्या बहीण अशा योजनेतील पैसे परस्पर कर्ज खात्यात वर्ग झाल्याने अनेक शेतकरी तिवारी नामक मॅनेजरकडे आपली तक्रार घेऊन जातात.
मॅनेजर मराठीत न बोलता हिंदीतच बोलतो, शेतकऱ्यांच्या तक्रारी
मात्र हे मॅनेजर मराठीत न बोलता हिंदीत बोलतात व हिंदी भाषा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समजत नसल्याने अनेक अडचणींचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतो. या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये जात मोठा गोंधळ घातला. तुम्हाला मराठी बोलता येत नाही, तर तुम्ही इकडे आले कशाला? तुम्ही परत जा....! तुम्हाला मराठी बोलावेच लागेल...! अशा शब्दात अमोल पाटील यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कान उघडणे केली. यावेळी जवळपास दीड तास बँकेत चांगलाच गोंधळ उडाला होता.
देशी कट्टा अन् धारदार चाकूचा धाक दाखवित लुटपाट, तिघांना बेड्या
पांढरकवडा येथे एका धाबा चालकासह त्यांच्या मुलाला तिघांनी देशी कट्टा आणि धारदार चाकूचा धाक दाखवित लुटल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात काउंटर मधील 15 हजार रुपये बळजबरीने हिसकावून आरोपी पसार झाले आहेत. करण संजय शिंदे, सुजिम वानखडे, शेख समीर शेख चांद असे लूटमार करणारे आरोपींची नाव आहे. अंकित आणि नरपत राम कुलरिया हे दोघे धाबा मालक धाबा बंद करीत होते. दरम्यान आलेल्या आरोपींनी जेवण मागण्याचा बहाना करून त्यांच्याशी वाद घातला. तसेच चाकू आणि देशी कट्ट्याचा धाक दाखवून काउंटरमध्ये असलेले 15 हजार रुपये हिसकावून पळ काढला. त्यानंतर धाबा मालक यांनी लगेचच पांढरकवडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान पांढरकवडा पोलिसांनी घटनेची रीतसर माहिती घेऊन आरोपीचा शोध सुरू करत काही वेळातच आरोपीला अटक केली.
हे ही वाचा