नागपूर : इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. यात इंद्रजित सावंत यांना एका कॉलवरुन शिवीगाळ करत तुम्हाला घरात घुसून मारु, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. डॉ. प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) नावाच्या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना फोनवरुन ही धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या व्यक्तीने आपण इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप फेटाळून लावला. माझ्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केला असावा, असे कोरटकर यांनी म्हटले आहे. मात्र, इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली असून राज्याच्या गृहखात्याने ही गांभीर्याने दखल घेतली आहे.

प्रशांत कोरटकरांच्या घरासमोरील पोलीस सुरक्षेत वाढ

अशातच, हा फोन कॉल नागपुरातील पत्रकार डॉ. प्रशांत कोरटकर यांचा नावाने आल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या कथित व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत प्रशांत कोरडकर नावाच्या इसमाचा शोध सध्या पोलीस घेत आहे. परिणामी कोल्हापूरचे पोलिसांचे पथक प्रशांत कोरडकर नावाच्या इसमाचा शोध घेण्यासाठी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. या पथकामध्ये एक अधिकारी आणि अन्य चार कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा इसमाने प्रशांत कोरडकर नावाने फोन करून धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आज (26 फेब्रुवारी) सकल मराठा समाजाच्या वतीने नागपूरच्या प्रशांत कोरटकर घरासमोर आंदोलन सुरू केलं आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्या घरासमोर पोलीस सुरक्षा वाढवली आहे. 

सावंतांना हात लावून दाखवा मग आम्ही कोण आहे ते दाखवू - उपराकार लक्ष्मण माने  

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकीच्या फोनवर उपराकार लक्ष्मण माने यांनी धमकी देणाऱ्याला सडेतर उत्तर दिलं आहे. यामध्ये त्यांनी इंद्रजीत सावंत हे संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले हा खरा इतिहास मांडत आहेत. तुम्ही खरा इतिहास खोडून नवीन इतिहास तयार करताय. ज्या दिवशी संभाजी महाराजांना मारले तो दिवस पाडव्याचा आहे, या दिवशी गुढ्या कोणी उभारायला सांगितल्या. औरंगजेबाने सांगितल्या का? संभाजी महाराजांना कसे मारायचे हे कोणी सांगितले? हा विचार करण्याची गरज आहे.

या सर्व गोष्टींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार करायला पाहिजे. मी याचे समर्थन करत नाही.  हिंसेला आमचा कडाडून विरोध आहे. संघ हिंसेच्या बाजूचा आहे आणि फडणवीस देखील हिंसेच्या बाजूचे आहेत. याविषयी त्यांनी खुलासे करणे गरजेचे आहे. इंद्रजीत सावंत एकटे नाहीत. आम्हाला पण असे धमकीचे फोन येतात, पण आम्ही त्याला जुमानत नाही. आम्ही बंदुकीने मारत नाही. आम्ही दगडाने मारतो. धमकी देणारे भित्रे आहेत त्यांचा बाप आला तरी ते इंद्रजीत सावंत यांना मारू शकणार नाही, अशी परखड प्रतिक्रिया उपराकार लक्ष्मण माने यांनी दिली आहे. 

हे ही वाचा 

Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत