Budh Uday in Vrischik 2023: दिवाळीचा महिना सुरू झाला आहे. सण आणि धर्माव्यतिरिक्त हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप खास आहे. दिवाळीपूर्वी शुक्र आणि शनि यांसारखे महत्त्वाचे ग्रह भ्रमण करतात. आता दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धन, व्यापार, वाणी, बुद्धी आणि तर्क यांचा दाता असलेल्या बुध ग्रहाचा उदय होणार आहे.


रविवारी, 12 नोव्हेंबरला दिवाळी (Diwali 2023) साजरी होईल आणि दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबरला बुध ग्रहाचा उदय होईल. वृश्चिक राशीमध्ये होत असलेल्या बुधाच्या उदयाचा सर्व राशींच्या करिअर आणि व्यवसायावर मोठा परिणाम होईल. 3 राशींना बुधाचा उदय विशेष लाभ देऊ शकतो. या लोकांच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. 


बुधाच्या उदयामुळे 'या' राशीच्या लोकांना मिळणार लाभ 


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या भाऊ-बहिणींचं अभूतपूर्व सहकार्य लाभेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी कराल. तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. तुमचं धैर्य आणि उर्जा वाढेल. जीवनात आनंद मिळेल. तुम्हाला खूप समाधान वाटेल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसायात भरघोस नफा मिळेल. 


वृश्चिक रास (Cancer)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय विशेषत: फलदायी आहे, कारण बुध या राशीत प्रवेश करणार आहे आणि या राशीतच त्याचा उदय होईल. या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात तुम्हाला सुधारणा दिसून येईल. तुमची कार्यशैली चांगली राहील. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काही चांगले निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या निर्णयांचा तुम्हाला फायदा होईल. करिअरसाठी हा चांगला काळ आहे. या राशीच्या व्यावसायिकांनाही अधिक फायदा होईल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. 


मकर रास (Capricorn)


बुधाच्या उदयामुळे मकर राशीच्या लोकांना शुभ फळ मिळेल. तुमचं उत्पन्न वाढेल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांतून पैसे मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करून तुमचे सर्व आर्थिक प्रश्न सुटतील. व्यापारी वर्गाला भरपूर नफा मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होईल. जोखमीची गुंतवणूकही चांगला परतावा देऊ शकते. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope 2024: नववर्ष 2024 मध्ये उजळणार 'या' 4 राशींचं भाग्य; संपत्तीत होणार वाढ, गुरू-शनिची होणार कृपा