नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. यात सरकार शेतकऱ्यांशी चर्च करण्यास तयार असून चर्चेतूनच मार्ग निघणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की चर्चेदरम्यान सरकारने दिलेली ऑफर अद्याप कायम आहे.


शेतकऱ्यांची इच्छा असेल तर चर्चा करू - पंतप्रधान मोदी
सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाच्या वतीने राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद आणि इतर नेत्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. पीएम मोदी म्हणाले की सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. कृषी कायद्यावर, आम्ही फक्त एक फोन कॉल दूर आहोत. जर शेतकऱ्यांची इच्छा असेल तर चर्चा करायला सरकार तयार आहे.


Farmer Protest | सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलक आणि स्थानिकांमध्ये झटापट, दोन पोलीस अधिकाऱ्यांसह पाच जण जखमी


केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक झाली. जवळपास सर्वच पक्षांनी या बैठकीत भाग घेतला. लोकसभेत विधेयकाव्यतिरिक्त चर्चा करण्याची विरोधकांची मागणी असून त्यासाठी सरकार तयार आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेची मागणीही विरोधकांनी केली आहे, त्यासाठी आम्हीही सहमत आहोत. पंतप्रधान म्हणाले की आम्ही कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार आहोत.


Sanjay Raut | दिल्ली हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा पूर्वनियोजित कट -संजय राऊत


काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की पंतप्रधानांनी सरकार आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेबद्दल सांगितले. ते इतकेच म्हणाले की, कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय की आपण त्यांच्यापासून एक फोन दूर आहोत. फक्त शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारावा. दरम्यान, सरकार या मुद्द्याला अहंकार आणि अडून पाहत असल्याचे चौधरी म्हणाले.


Rakesh Tikait | सरकार आंदोलन संपवण्याच्या प्रयत्नात, कायदे मागे घेईपर्यंत हटणार नाही - राकेश टिकैत