लंडन :  अन्न हा घटक लोकांना एकत्र आणू शकतो किंवा त्यामुळे लोकांत वादही घडू शकतो. या आठवड्यात ट्विटरवर घडलेल्या एका प्रकारानं सर्वांचं लक्ष तिकडं वळवलं. 'इ़डलीगेट' या नावाने प्रसिध्द झालेल्या घटनेने भारतीय लोकांचे खासकरून दक्षिण भारतीयांचे इडलीवरचं प्रेम अधोरेखित केलं. हा प्रकार सुरु झाला तो झोमॅटो या भारतीयफूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने ट्विटरवर विचारलेल्या एका साध्या प्रश्नाने. झोमॅटोने विचारले की, "अशी कोणती डिश आहे की तुम्हाला समजत नाही की लोकांना का आवडते."


प्रश्न तसा साधा होता पण यावरील एका आलेल्या एका रिप्लायला दक्षिण भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. युकेतील इतिहासाचे प्रोफेसर आणि भारत-ब्रिटन अभ्यासातील तज्ञ एडवर्ड अँडरसन यांनी त्यावर रिप्लाय देताना लिहिले की, "इडली जगातील सर्वात बोरिंग गोष्ट आहे."





या त्यांच्या रिप्लायवर भारतीय खाद्यप्रेमी तुटून पडले. अनेकांनी अँडरसनच्या या मताचा ट्विटरवर निषेध केला. एका भारतीयाने याला रिप्लाय देताना लिहले की अँडरसन हा 'मुर्ख गोरा मुलगा'आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने अशी माहिती दिली की इडली या पदार्थाने संपूर्ण दक्षिण भारताला एक केले आहे. ईशान थरूर याने यावर एक गमतीदार आणि वेधक ट्विट केले. तो म्हणाला की अँडरसन यांचे इडलीबाबतचे मत हे 'आत्तापर्यंत ऐकलेले सर्वात आक्षेपार्ह मत आहे.'


ईशानचे वडील आणि काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी जेंव्हा या वादात उडी घेतली तेंव्हा अनेक इडली प्रेमींना सुखद धक्का बसला. त्यांनी ट्विटरवर इडली बाबत त्यांच प्रेम व्यक्त करताना ईशानच्या ट्विटला रिप्लाय देताने लिहले की," संस्कृती अंगीकारणे  खूप अवघड आहे. इडलीची टेस्ट घेणे आणि त्याची प्रशंसा करणे, क्रिकेटचा आनंद घेणे किंवा ओट्टमथुलाल पाहणे ही प्रत्येक मर्त्य मनुष्याला शक्य असणारी गोष्ट नाही. जीवन काय असू शकते हे कधीच न समजू शकणाऱ्या या गरीब माणसावर दया करा.





भारतीयांनी त्यांचे खाद्यपदार्थावर असलेल्या प्रेमाच्या अतिरेकाचा उद्रेक हा काही पहिल्यांदाच झालेला नाही. या आधीही दक्षिण आफ्रिकेच्या एका फूड चॅनेलने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बिर्यानीची रेसिपी अपलोड केली होती. त्यावेळीही असेच रिप्लाय भारतीयांकडून दे्ण्यात आले होते. संपूर्ण भारत महिला सुरक्षा, जातीय द्वेष, धार्मिक राजकारण, आणि लोकशाहीला असणाऱ्या धोक्यांवर चर्चा करत असताना या इडलीगेट च्या प्रकरणाने ट्विटर युजर्सना या चर्चांपासून काही काळ विश्रांती मिळाल्याचे पहायला मिळाले.


// ]]>