Bra Bracelet Videos : सोशल मिडीयावर (SOCIAL MEDIA) हटके व्हिडीओ जोरदार व्हायरल (VIRAL) होत असतात. सोशल मीडिया आणि त्यावर व्हायरल होणारे मनोरंजक व्हिडीओंनी (VIDEO) नेटकऱ्यांना वेड लावले आहे. कित्येकदा सोशल मिडीयावर खूप वेगवेगळे ट्रेंड (TREND) येत असतात. त्यामुळे एकाच प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयाच्या पेजवर व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर (INSTAGRAM) एखादे गाणे चांगलेच ट्रेंड होऊ लागले की त्याच गाण्यावर अनेक व्हिडीओ बनवले जातात. तसेच काही विविध चॅलेंजचे अतरंगी व्हिडीओसुद्धा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात केले जातात. आता याच चॅलेंज (CHALLENGE)  पैकी एक नवखा प्रकार म्हणजे  ब्रा ब्रासलेट. 


या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही कपल एकमेकांना भेट म्हणून 'ब्रा ब्रासलेट' (BRA-BRACELET) देत आहेत. तर हे ब्रासलेट नेमके आहे तरी काय? ते का चर्चेत आहे हे जाणून घेऊया.


सगळे कपल्स (COUPLES) हे एकमेकांच्या हातावर ब्रा ब्रासलेट बांधताना दिसत आहेत. हे ब्रा ब्रासलेट आता आॅनलाइन (ONLINE) प्लॅटफाॅर्मवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्यामध्ये त्या स्ट्रीप वर फुलांचे चित्र, आकर्षक शिवणकाम तसेच त्यावर कोरलेली अक्षरे अशा स्वरूपातसुद्धा हे ब्रासलेट मिळत आहेत. विशेष म्हणजे या स्ट्रीप्स वर तुम्ही तुमच्या पार्टनरचे नाव ही लिहून घेवू शकता. 






काय आहे ब्रा ब्रासलेट? (What Is Bra Bracelet)


याच्या नावावरूनच लक्षात येतेय की , ब्रा ब्रासलेटचा डायरेक्ट संबंध हा महिलांच्या इनरवेअरशी आहे. हे ट्रेंड होणारे  ब्रा ब्रासलेट बनवले जातेय. ब्राच्या स्ट्रीपपासून. यामध्ये ब्रा (BRALETTE) स्ट्रीप हातावर ठेवून त्याचे एक टोक दुसऱ्या टोकात अडकवले जाते. तसे पाहता यात काही विशेष नाही. मात्र ज्या पद्धतीने या ब्रा ब्रासलेटचा आकर्षित करणारा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते पाहून प्रत्येक जण हे फाॅलो (FOLLOW) करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजारात देखील आता हे मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. आॅनलाइन वेबसाइट्सवर (ONLINE WEBSITE) याच्या बऱ्याच डिझाइन मिळत आहेत. कमी खर्चात चांगले गिफ्ट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय कपल असणाऱ्या मुला-मुलींसाठी आहे. हे ब्रा ब्रासलेट विदेशी शाॅपिंग  वेबसाइट्सवर सुध्दा उपलब्ध आहेत. प्रेमाची निशाणी म्हणून हे ब्रा ब्रासलेट दिले जात आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या