Varun Dhawan Border 2 Film Shooting : देशभक्तिपर बॉलिवूड चित्रपटांची क्रेझ कायम पाहायला मिळते. 90 च्या दशकात आलेल्या एका देशभक्तिपर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अशाप्रकारे स्थान निर्माण केलं की, ते आजतागायत कायम आहे. किती चित्रपट आले आणि गेले पण, या चित्रपटाची जागी कोणत्याही चित्रपटाला घेता आलेली नाही. 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाची जागा बॉलिवूड चाहत्यांच्या मनात निर्माण केलेलं स्थान अढळ आहे. आता 27 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल येत असून, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. अभिनेता वरुण धवन याने सेटवरील फोटो शेअर केला आहे.

Continues below advertisement

27 वर्षांनंतर येणार ‘बॉर्डर’चा सीक्वेल

दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर बॉलिवूडचा सूपरहिट देशभक्तिपर चित्रपट बॉर्डरचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. अभिनेता वरुण धवनने बॉर्डर 2 च्या सेटवरील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाचं चित्रीकरण झाशीमध्ये सुरू झालं आहे. अभिनेता वरुण धवनने त्याच्या शूटिंग लोकेशनचा फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

बॉर्डर 2 च्या शूटींगला सुरुवात

बहुप्रतिक्षित बॉर्डर 2 चित्रपटाचं चित्रीकरण झाशीमध्ये सुरू आहे. अभिनेता वरुण धवन शूटींगसाठी झाशीमध्ये पोहोचला आहे. वरुण धवनने त्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. झाशीच्या छावणी परिसरात हा सेट उभारण्यात आला आहे. हा चित्रपट 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा लोंगेवाला युद्ध (1971) च्या घटनांवर आधारित एक महाकाव्य युद्ध चित्रपट आहे. जे. पी. दत्ता दिग्दर्शित हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानची परिस्थिती दर्शवणारा आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरुण धवन भूषण कुमार आणि निधी दत्तासोबत दिसत आहे. 

Continues below advertisement

'हे' कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत

'बॉर्डर 2' चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांच्यासह इतर निर्मिती टीमने केली आहे. अनुराग सिंग आणि जेपी दत्ता यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. बॉर्डर 2 चित्रपटात अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) याच्यासोबत, अभिनेता सनी देओल (Sunny Deol), दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी (Ahan Shetty) हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Border 2 : बॉर्डर 2 मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री, सनी देओलसोबत दिसणार अहान शेट्टी