Ahaan Shetty in Border 2 Movie : देशभक्तिपर चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कायम क्रेझ पाहायला मिळते. 1997 मध्ये आलेला बॉर्डर चित्रपट प्रेक्षकांच्या आवडत्या देशभक्तिपर चित्रपटांपैकी एक आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. आता 27 वर्षानंतर बॉर्डर चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा झाली आहे. बॉर्डर 2 चित्रपटात अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याची वर्णी लागली आहे.


बॉर्डर 2 मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री


27 वर्षांनंतर बॉलिवूडचा सुपरहिट बॉर्डर चित्रपटाचा दुसरी भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉर्डर 2 मध्ये सुनील शेट्टीच्या जागी ज्युनियर शेट्टीची एन्ट्री झाली आहे. सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉर्डर 2 चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. टी सीरीजच्या आगामी बॉर्डर 2 चित्रपटाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 


सुनील शेट्टीच्या लेकाची बॉर्डर 2 मध्ये वर्णी


बॉर्डर 2 चित्रपटामध्ये आता सनी देओलसोबत अयान शेट्टीही दिसणार आहे. बॉर्डर 2 चित्रपटामध्ये याआधीच सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसोबत यांची भूमिका असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती, त्यात आता अयानचं नावही जोडलं गेलं आहे. बॉलिवूड चाहते आता बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल पाहण्यास आतुर झाले आहे.


अहानची शेट्टीच्या आवाजातील खास व्हिडीओ


बॉर्डर चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी अहानच्या नावाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी बॉर्डर 2 च्या टीममध्ये अहानचे स्वागत करणारा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओची सुरुवात 'बॉर्डर' चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेच्या फोटोने होते. यानंतर अहान शेट्टीच्या आवाजात एक डायलॉग ऐकू येतो.


 






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Singham Again Trailer : 'या' दिवशी रिलीज होणार 'सिंघम अगेन'चा ट्रेलर, त्या आधीच सोशल मीडियावर फेक VIDEO व्हायरल