BMC Election 2026 मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा (BMC Election 2026) काल प्रचार थंडावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. आता उद्या म्हणजेच 15 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणुका होणार आहे. तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. त्याआधी मुंबईत ठाकरे बंधू की शिंदे-फडणवीस?, मुंबईत कोणाचं पारडं जड आहे?, याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी विश्लेषण मांडलं आहे. (Mahyuti Vs Thackeray Brothers)

Continues below advertisement

महानगरपालिका निवडणुकांच्या वैशिष्य म्हणजे 2017 सालच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे सरकारमध्ये एकत्र होते. शिवसेना एकसंघ होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेना स्वतंत्र्यपणे लढले. भाजपचा भर ठाकरेंची राजवट कशी असते, त्यांची वैशिष्ट काय?, महापालिकेत शिवसेनेने काय केलं?, यावर प्रचार झाला. 2017 च्या महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारात एक मर्यादा होती. कारण सरकारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2026 च्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाकडून मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठीचं काय होईल?, यावर प्रचार केला. तर भाजपकडून आधी हिंदू-मराठी, मग मुंबईचा महापौर खान होईल, असा प्रचार सुरु केला.  पण शेवटी मराठीच्या मुद्यावरचं आलं. काँग्रेसने बहुभाषिक मतदान आहे. परप्रांतीय आहेत. पण काँग्रेसनेही बाहेरील लोकांची बाजू आक्रमकपणे मांडली नाही. कारण त्यांच्याही लक्षात आलं की बहुतेक मुंबईमध्ये मतांचे ध्रुवीकरण होतंय. हे या प्रचाराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरलं. (BMC Election 2026)

मनसे आणि ठाकरे गटाची टक्केवारी सर्वांत जास्त- (Shivsena UBT-MNS Yuti)

आत्ताच्या घडीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाचं पारडं जड आहे, हे सांगता येत नाही.सुरुवातीला भाजप आणि शिवसेना शिंदे गट प्रचारात खूप पुढे आहेत. ठाकरे बंधू मागे पडलेत, असं वाटत होतं.  परंतु ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्कवरील सभेनंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचं नक्कीच पारडं जड झालं आहे. 2017 साली एकसंघ शिवसेनेला 84 जागा, भाजपला 82 जागा आणि मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये आपण टक्केवारी पाहिली तर  जवळपास 7 टक्क्यांच्या आसपास मनसेला मते पडली होती. मनसेची ती 7 टक्के आणि एकसंघ शिवसेनेला मिळालेली मते पाहिली तर सगळ्यात जास्त टक्केवारी होते. 

Continues below advertisement

शिवाजी पार्कवरील सभेनंतर ठाकरेंचं पारडं वाढलं- (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance)

उद्धव ठाकरेंना 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत 10 जागा मिळाल्या होत्या. आताही मुंबईत ठाकरेंना चांगला प्रतिसाद मिळाल्यास ठाकरे बंधू पुढे एकत्र दिसतील. भाजप अतिशय ताकदीने लढतंय. भाजपची व्यूहरचना जबरदस्त आहे. भाजपच्या या व्यूहरचनेची बरोबरी इतर कोणताही पक्ष करु शकत नाही. परंतु शिवाजी पार्कवरील सभेनंतर ठाकरेंचं पारडं वाढलं आहे, असं मत रविकिरण देशमुख यांनी सांगितलं. एकनाथ शिंदेंनी मुंबईत जास्त सभा घेतल्या नाही. एकनाथ शिंदेंना वाटलं असेल, जेवेढं आपण ठाकरेंवर टीका करु तर तु्म्ही ठाकरेंचे विरोधक आहात का?, असे विचारले जाईल. कारण विधानसभेच्या निवडणुकीत 20 जागा निवडून आल्या होत्या. त्यातील 10 जागा मुंबईत जिंकल्या होत्या. मुंबई शहरात ठाकरेंनी चांगलं अस्तित्व दाखवलं आहे. शिंदे गटाच्या एका नेत्याने म्हटलं होतं, की विधानसभेच्या निवडणुकीत सहा ते सात जागा  मनसेमुळे गमावल्या. आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र आहे, याचा परिणाम आता पाहायला मिळेल, असं रविकिरण देशमुख यांनी सांगितले. 

संबंधित बातमी:

BMC Election 2026: सर्वाधिक हायहोल्टेज असलेल्या मुंबई मनपाचा निकाल लांबणार! नेमकं कारण आलं समोर